इयत्ता 9 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी ‘महाकरिअर’पोर्टल वर नोंदणी अनिवार्य

798

विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र शासन शिक्षण विभाग, SCERT पुणे यांनी खास इयत्ता 9 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी ‘महाकरिअर‘पोर्टल सुरू केले आहे.

महाकरिअर पोर्टल मध्ये 🗺️ जगभरातील महत्त्वाच्या 16 देशांमधील

🎯1200+ विविध देशी,विदेशी पात्रता अथवा प्रवेश परीक्षांची परिपूर्ण माहिती.
फॉर्म भरणे
फी
परीक्षा स्वरूप
परीक्षा कालावधी
महत्वाच्या तारखा
अजून बरेच काही.

🎯 2,60,000 पेक्षा जास्त देशी, परदेशी छोटे मोठे व्यावसायिक कोर्सेस ची सविस्तर माहिती

🎯 550 पेक्षा जास्त विविध देशी, परदेशी क्षेत्रातील करिअरची परीपूर्ण माहिती

🎯 21000 पेक्षा जास्त देशी,परदेशी विविध सरकारी, खाजगी व्यावसायिक संस्था, ट्रेनिंग सेंटर्स, शाळा, कॉलेजेसची तसेच विद्यापीठांची माहिती.

🎯 1120 पेक्षा जास्त विविध देशी, परदेशी कोर्सेस, शिक्षणासाठी स्कॉलरशिप् , फ्रिशिप्, फेलोशिप, तसेच अर्थ सहाय्य करणारे ट्रस्ट, कमीत कमी व्याजदर घेऊन शैक्षणिक कर्ज देणाऱ्या बॅंक,

संबंधित कोर्ससाठी आवश्यक पात्रता,कोर्सेस कालावधी,
कौशल्ये, गुणवैशिष्ट्ये फी, प्रवेश परीक्षा, स्कॉलरशिपची माहिती

🪶 शिवाय संबंधित कोर्स पूर्ण केल्यानंतर कोणत्या क्षेत्रात काम, पद, तसेच सुरवातीचे वेतन, अनुभवानंतर वेतन, तसेच भविष्यात येणाऱ्या अडचणी तसेच त्याबाबतचे निवारण याविषयीची माहिती.
तसेच संबंधित क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्ती यासर्वांची माहिती

🖱️ फक्त एका क्लिकवर

एकाच व्यासपीठावर म्हणजेच

महाकरिअर पोर्टल
💳💳💳💳💳💳

चला तर मग या जाणून घेऊ करिअरचा परिपूर्ण खजिना

🔑Google Chrome Firefox किंवा Google search ओपन करा.

www.mahacareerportal.com
किंवा http://mahacareerportal.com
टाईप करा.

🕹️ किंवा संबंधित लिंकवर क्लिक करा. येणाऱ्या डॅशबोर्डवर 🖥️

➡️ 19 अंकी सरल आयडी क्रमांक टाकावा.

➡️ 123456 हा पासवर्ड टाकून login करा. हा पासवर्ड सर्व विद्यार्थ्यांसाठी एकच आहे.

✒️ आपला सरल आयडी क्रमांक वर्ग शिक्षक, मुख्याध्यापक किंवा लिपिक यांच्याकडून घ्यावेत.

🔎 अधिक माहितीसाठी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here