आदिवासी विकास विभागाचा माध्यमातून जव्हार प्रकल्प अंतर्गत शासकीय आश्रमशाळा साकुर येथील मनीषा भावर, अपेक्षा बोरसे व वर्षा अवतार तर एकात्मिक आदिवासी प्रकल्प घोडेगाव अंतर्गत शासकीय माध्यमिक आश्रमशाळा आहूपे,ता.आंबेगाव, जि.पुणे येथील अर्चना गणपत धादवड,शासकीय माध्यमिक आश्रमशाळा असाने,ता.आंबेगाव, जि.पुणे येथील कुसुम चिमा गवारी,शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळा सोमतवाडी,ता.जुन्नर, जि.पुणे येथील आरती सिताराम जंगले,
कीर्ती शिवाजी शिद,आशा रामदास तुरे इ.विद्यार्थ्यीनी सध्याच्या कोरोना च्या संक्रमण कालावधीत आरोग्य विभागात महत्वाची भूमिका पार पाडत असून आदिवासी विकास विभागाच्या वतीने चालवण्यात येत असलेल्या वसतिगृह व आश्रमशाळां मधील अनेक विद्यार्थीनी नर्स म्हणून समाजात काम करत आहेत. त्यांचे प्रतिनिधीक स्वरूप मनीषा, अपेक्षा, वर्षा, कुसुम,आरती आणि अर्चना आहेत.
आजच्या जागतिक परिचारिका दिनानिमित्त आदिवासी विकास विभागाच्या सर्व माजी विद्यार्थीनी व आता परिचारिका म्हणून काम करत असलेल्या कोरोना योद्ध्यांना हार्दिक शुभेच्छा!
शब्दांकन :- राहूल शिरसाठ,राजूर