——-6 जून शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शाळा फाऊंडेशन कडून कोण होणार महाराष्ट्राचा शिवभक्ता या राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोना आजाराच्या संकटकाळात संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची शाळा बंद असून त्यांचे शिक्षण अविरतपणे सुरु आहे.विद्यार्थी घरी आहेत त्यामुळे त्यांच्या वक्तृत्व कलेला संधी मिळावी या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
इयत्ता पहिली ते इयत्ता चौथी व इयत्ता पाचवी ते इयत्ता आठवी या दोन गटात ही स्पर्धा होणार असून पहिल्या गटासाठी राजमाता जिजाऊंचे संस्कार हा विषय व दुसऱ्या गटासाठी छत्रपती शिवाजी महाराज एक जाणता राजा या विषयावर विद्यार्थ्यांना आपले वक्तृत्व कला मांडण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या स्पर्धेत विद्यार्थी मोफतपणे सहभागी होऊ शकतात. दोन्ही गटासाठी प्रथम क्रमांक ₹ 2525 व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांकासाठी ₹2121व प्रमाणपत्र, तृतीय क्रमांकासाठी ₹1515 व प्रमाणपत्र उत्तेजनार्थ दोन क्रमांक निवडले जाणार असून त्यांना ₹1010 व प्रमाणपत्र अशा स्वरूपाची पारितोषिक या स्पर्धेसाठी देण्यात येणार आहेत.
दोन फेरीमध्ये होणाऱ्या स्पर्धेत दुसऱ्या फेरीतील उत्कृष्ट भाषणे शाळा फाऊंडेशन या युट्युब चॅनेलवर अपलोड करून ती प्रसिद्ध केली जाणार आहेत.व्हिडिओला मिळणारी ऑनलाईन पसंती व परीक्षक गुणांकन यांच्या आधारावर विजेते घोषित केले जाणार आहेत. सर्व सहभागी स्पर्धकांना संस्थेकडून प्रमाणपत्र मिळणार असून विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणाचे व्हिडिओ 75 88 79 70 82 या क्रमांकावर व्हाट्सअपद्वारे दिनांक 23 मे पर्यंत पाठवावे असे आवाहन शाळा फाऊंडेशनचे मुख्य संयोजक श्री प्रतापसिंह मोहिते यांनी केले आहे.