वार्ताहर: जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थी संख्या वाढीच्या हेतूने अंगणवाडी जिल्हा परिषद शाळेला ‘लिंक’ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शिक्षण व क्रीडा विभागाने घेतला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सुरुवात अंगणवाडीपासून होते. त्यामुळे अंगणवाडी अधिक दर्जेदार करण्याचा हेतू यामागे आहे. अंगणवाडीमध्ये मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यावर विभागाचा भर असणार आहे. सद्यस्थितीत मोजक्याच अंगणवाड्यांची स्थिती चांगली आहे आणि काही अंगणवाड्या ग्रामपंचायत, समाजमंदिर आदी सार्वजनिक ठिकाणी भरत आहेत तर काही मदतनिसानच्या घरी आणि भाड्याच्या इमारतीत आहेत. एक शाळा एक अंगणवाडी किंवा एक शाळा दोन – तीन अंगणवाड्या, तत्त्वावर अंगणवाड्या शाळांना लिंक करण्याचे आदेश शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी नुकतेच दिले आहेत.
– शशिकांत इंगळे,अकोला