विनंतीशिवाय इतर कोणत्याही ऑनलाईन किंवा ऑफलाईन प्रशासकीय बदल्या करू नयेत.- मा.आमदार कपिल पाटील

318

आंतरजिल्हा आणि जिल्हाअंतर्गत बदलीच्या प्रतिक्षेत असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांमध्ये तणावाचे वातावरण आहे. प्रत्येक जिल्हयातील कोविडची परिस्थिती पाहता शिक्षकांच्या आरोग्याची दक्षता घेत विद्यार्थी आणि शिक्षकांच्या सोयीनुसार बदली प्रक्रिया राबवावी.

1) आंतरजिल्हा बदल्या 100% करण्यात याव्यात,टप्पा क्रमांक 5 मध्ये कोकण विभागातील जिल्ह्यांचा समावेश करावा. पवित्र प्रणालीद्वारे भरली जाणारी शिक्षकांची रिक्त पदे गृहित धरावी.

2) जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेत विनंतीशिवाय इतर कोणत्याही ऑनलाईन किंवा ऑफलाईन प्रशासकीय बदल्या करू नयेत,बदलीपात्र होण्यासाठी संदर्भ दिनांक 30 जून आणि सेवेची अट 3 वर्षे असावी.

3) विद्यार्थ्यांना त्यांची स्थानिक भाषा अवगत असलेले शिक्षक मिळण्याचा कायद्याने दिलेला अधिकार शाबूत ठेवावा.(RTE Geographical and Linguistic disadvantage group) 4) रेडम राऊंड व विस्थापित झालेले तसेच दुर्गम भागातील शिक्षकांवरील अन्याय दूर करावा. (उदा. मेळघाटअमरावती) त्यांना त्यांच्या विनंतीनुसार बदली द्यावी.

सुगम-दुर्गम क्षेत्राचा समतोल राखण्यासाठी आवश्यकता भासल्यास तेवढ्याच प्रशासकीय बदल्या कराव्यात.

5) पती-पत्नी एकत्रीकरणानुसार तसच एकल शिक्षकांच्या विनंती नुसार बदल्या कराव्यात.

6) महिला शिक्षकांची विनंती प्राधान्याने मान्य करावी

7) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक व केंद्र प्रमुख यांची रिक्त पदे तातडीने भरावीत. पदोन्नतीची रखडलेली प्रक्रिया गतिमान करावी.

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांची बदली प्रक्रिया राबवताना वरील बाबींचा विचार व्हावा अशी विनंती शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी ग्रामविकास मंत्री व सचिव यांना पत्राद्वारे विनंती केली आहे

संदर्भित पत्र:-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here