Udise भरण्यास मिळाली ३१ मे २०२१ पर्यंत मुदत वाढ…

351

भारत सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान विभाग यांनी विकसित केलेल्या यु-डायस प्लस ऑनलाईन प्रणालीमध्ये राज्यातील सर्व शाळांची माहिती राज्य / जिल्हा / महानगरपालिका / तालुका / शाळास्तरावरुन ऑनलाईन पध्दतीने दि. ३० सप्टेंबर, २०२० या संदर्भिय दिनांकानुसार यु-डायस प्लस प्रणालीमध्ये दि. ३१ मे, २०२१ पर्यंत राज्यातील शाळांची माहिती ऑनलाईन पध्दतीने संगणकीकृत करण्याकरिता कळविले आहे.

देशामध्ये कोविड १९ चा प्रादूर्भाव असल्याने लॉकडाऊनची परिस्थिती ओढवली आहे त्यामुळे राज्यातील शाळा ऑनलाईन पध्दतीने सुरु आहे. सन २०२१-२२ समग्र शिक्षा या योजनेचे वार्षिक नियोजन व अंदाजपत्रक तयार करण्याकरिता जिल्ह्यातील शाळांची अद्यावत माहितीची आवश्यकता आहे. कोविड १९ चा विचार करता भारत सरकारकडून सन २०१९-२० या वर्षामध्ये विकसित केलेल्या प्रपत्रानुसार सन २०२०-२१ च्या प्रपत्रामध्ये काहीही बदल न करता शाळांमध्ये उपलब्ध झालेल्या सोयीसुविधांची, शिक्षक, विद्यार्थी, मोफत पाठपुस्तके, गणवेश, दिव्यांग विद्यार्थ्यांना दिलेल्या सोयीसुविधांची माहिती ऑनलाईन पध्दतीने यु-डायस प्लस प्रणालीमध्ये माहे ३१ मे, २०२१ पर्यत यु-डायस प्लस प्रणालीमध्ये अद्यावत करुन पुर्ण करण्याकरिता कळविले आहे.

अधिकृत पत्र:-

Powered By EmbedPress

पूर्ण पत्र वाचण्यासाठी एकदा पत्रावर स्पर्श करा,आपल्याला next page चा पर्याय दिसेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here