‘एकलव्य मॉडेल स्कुल भरती प्रक्रिया’ ऑनलाईन फॉर्म भरण्यास मुदतवाढ मिळावी- महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कुल सोसायटी

440

एकलव्य मॉडेल निवासी शाळा महाराष्ट्र करीता प्राचार्य, उपप्राचार्य, पदव्युत्तर प्रशिक्षित शिक्षक, पदवीधर प्रशिक्षित शिक्षक पदाच्या भरतीसाठी जाहिरात दिली आहे.
216 रिक्त पदांसाठी महाराष्ट्रासाठी असलेल्या जाहिरातीत विषय निहाय व जात निहाय आरक्षण संबंधी माहिती दिली आहे.
अहर्ता प्राप्त इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन आवेदन पत्र दिनांक 30 एप्रिल 2021 पर्यंत सादर करावयाचे आहेत.
आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर याकरिता मोठ्या प्रमाणात जाहिरात केली आहे. आपल्या माहितीसाठी आम्हाला दोन स्तरावरची माहिती द्यायला आवडेल.

  1. महाराष्ट्र शासनाच्या जातनिहाय आरक्षणाची याचिका कोर्टात प्रलंबित असल्यामुळे, एनईएसएटीएसने पाठविलेली जाहिरात याचिका महाराष्ट्र शासनाने संमत केली नाही.
  2. कोरोनाच्या दुसऱ्या भयानक लाटेच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र शासनाने 30 एप्रिल पर्यंत संपूर्ण लोक डाऊन केलेले आहे.
    त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील प्राप्त इच्छुक उमेदवार निर्धारित वेळेत म्हणजे 30 एप्रिल 2001 पर्यंत, आपला उमेदवारी अर्ज सादर करू शकत नाहीत.

सर्व महाराष्ट्रामध्ये संपूर्ण लोक अडवून असल्यामुळे इंटरनेट सेंटर सायबर कॅफे पूर्णतः बंद असून इच्छुक उमेदवारांच्या मानसिक स्वास्थ्यावरही त्याचा परिणाम झालेला आहे.
लोकांकडून तसेच अशासकीय संघटनांकडून आम्हाला सतत संपर्क व विचारणा होत आहे.
म्हणून आम्ही आपणास सविनय विनम्रतापूर्वक आवाहन करतो की, कृपया ही अंतिम तारीख 30 मे 2001 पर्यंत वाढवावी. तसेच महाराष्ट्र शासनही तोपर्यंत न्यायालयीन प्रलंबित याचीके संबंधि निर्णय घेऊ शकेल.
मी पुन्हा विनंती आम्ही विनंती करतो की या विषयासंबंधी सौहार्द पूर्वक विचार कराल व या विषयास प्राधान्य द्याल हि सविनय अपेक्षा.
अपेक्षित उत्तराच्या अपेक्षेत!

अशी सदस्य सचिव,महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कुल सोसायटी,नाशिक यांनी आयुक्त,राष्ट्रीय अदिवासी विद्यार्थी शिक्षण समिती दिल्ली यांना पत्राद्वारे विनंती केली आहे.

भरती संदर्भातील जाहिरात –

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here