टेक्नो टिप्स:- जाणून घेऊ एअरप्लेन मोड चा उपयोग

254

Airplane/Flight Mode

मित्रांनो आपल्या सगळ्यांच्या मोबाईल मध्ये नोटिफिकेशन बार मध्ये Airplane Mode हा फंक्शन इनबिल्ट असतो म्हणजे असतोच.लॅपटॉप मध्ये सुद्धा फंक्शन असतो.याला offline mode, standalone mode, किंवा flight mode या नावाने ही ओळखले जाते.आपण तो कधी आपण वापरलेला नसतो,न वापरण्याचे कारण म्हणजे त्या विषयी आपल्याला माहिती नसणे किंवा त्याचे कधी काम पडले नाही.
तर आजच्या टेक्नो टिप्स मध्ये जाणून घेऊ या ‘एअरप्लेन मोड’ नेमकं असत तरी काय?

मित्रांनो जेव्हा आपण एअरप्लेन मोड हे विमानात प्रवास करत असताना वापरण्याचा पर्याय आहे ,म्हणजे प्रवासात तसा पर्याय निवडावा असे अपेक्षित असते.’एअरप्लेन मोड’ या फंक्शन वर क्लिक केल्यावर आपल्या मोबाईल चे नेटवर्क बंद होते,व हॉटस्पॉट किंवा wifi हे सुद्धा फंक्शन अॅटोमॅटिक बंद होतात.या मुळे आपण नाकुणाला फोन करू शकत ना इंटरनेट चालवू शकत.हे मोड अप्लाय केल्यावर आपल्या मोबाइल ची टॉवर सोबत असलेली कनेक्टिव्हिटी बंद होते.(ती सुविधा आपण मोबाईल सेटिंग मधून मॅन्युअली परत सेट करू शकतो हा वेगळा विषय)सामान्यतःमोबाईल सतत 24 तास नेटवर्क पकडून राहण्यासाठी कार्य करत असतो.आपण एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर जरी करत असलो तरी मोबाइल प्रत्येक वेळी वेगवेगळ्या ठिकाणच्या त्याच कंपनीशी रिलेटेड टॉवर सोबत कनेक्ट होण्याचा प्रयत्न करत असतो.या कार्यामुळे विमानात पायलट कॅबिन असलेल्या gps नेव्हीगेशन यंत्रणेवर परिणाम होऊन विमान दिशाहीन होऊ नये,पायलट च्या कार्यप्रणाली मध्ये बाधा येऊ नये म्हणून सुरक्षिततेच्या दृष्टीने विमानात ‘एअरप्लेन मोड’ किंवा मोबाईल स्वीच ऑफ करण्यास सांगितले जाते.पण जर चुकून हे करण्याचे विसरलो तर मग? याचा फारसा परिणाम पडत नाही पण काळजी म्हणून ही सावधानता घेतली जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here