नाशिक प्रकल्प कार्यालयाच्या अंतर्गत असलेल्या शासकीय/ अनुदानीत आश्रमशाळा व वसतिगृहाचे दिनांक ०५.०४.२०२१ पर्यंत शालेय कामकाज बंद ठेवण्या बाबत निर्देश देण्यात आले होते. तसेच विदयार्थ्यांना शाळेत/ वसतिगृहात पुढील आदेश येईपर्यंत बोलवण्यात येऊ नये असेही कळविण्यात आले होते. कोविड- १९ या आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता व ग्रामीण भागात कोवीड १९ च्या वाढता प्रार्दुभाव स्थानिक स्वराज्य संस्थेने स्थानिक पातळीवर शाळा बंदचे निर्देश दिलेले आहेत तसेच ग्रामिण भागातील विद्यार्थी पालकांच्या ताब्यात सुरक्षित राहावे या करिता सदर विद्यार्थ्यांना दिनांक ३०.०४.२०२१ पर्यंत शालेय कामकाज बंद ठेवण्यात यावे, विदयार्थ्यांना शाळेत/ वसतिगृहात पुढील आदेश येईपर्यंत बोलवण्यात येऊ नये.
तसेच इ.९वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांबाबत शालेय शिक्षण विभागचे सुचना प्राप्त होतील त्याप्रमाणे उचित कार्यवाही करण्यात यावी व सदर वर्गाच्या परिक्षेचे नियोजन करण्यात यावे.
#नाशिक प्रकल्प कार्यालय अंतर्गत येणारे सर्व मुख्याध्यापक,गृहपाल
शासकीय /अनुदानित आश्रमशाळा शासकीय वसतिगृह