आदिवासी विकास विभागांतर्गत शासकीय,अनुदानित व एकलव्य पब्लिकस्कुल आश्रमशाळांतील इयत्ता १२ वी विज्ञानच्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी व वैद्यकीय परिक्षा पुर्व तयारी मोफत प्रशिक्षण

221

अदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत चालविण्यात येणाऱ्या आश्रमशाळा व एकलव्य मधील पब्लिक स्कुल मधील इयत्ता 12 वी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी व वैद्यकीय परीक्षा पूर्व तयारी करीता मोफत प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

मोफत JEE व NEET प्रशिक्षण शिष्यवृत्ती
दक्षणा एक वर्षाच्या शिष्यवृत्ती कार्यक्रमात JEE व NEET साठी तुमच्या शाळेतील गरजू व पात्र विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण दिले जाते. JEE आणि NEET साठी एक वर्षाचा निवासी प्रशिक्षण कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी पूर्णपणे विनामूल्य आहे. विद्यार्थ्यांना किंवा शाळेला हे पूर्णपणे विनामूल्य आहे.
विद्यार्थ्यांची निवड चाचणीद्वारे (Joint Dakshana Selection Test – JDST) केली जाते. भारतातील सरकारी शाळांमध्ये इयत्ता १२ वी (विज्ञान) शिकणारे विद्यार्थी JDST साठी अर्ज करण्यास पात्र आहेत, जर त्यांनी दहावीच्या गणित व विज्ञान विषयात 60% पेक्षा जास्त गुण मिळवले असतील.

JDST 2021 नोंदणी प्रक्रिया:
१. JDST 2021 मध्ये सहभागी होण्यासाठी शाळांनी खालील लिंकवर नोंदणी करावी: http://dakshana.org/jdst
(नवीन शाळेवर क्लिक करा)
२. त्यानंतर दक्षणा १२ वी (विज्ञान) च्या विद्यार्थ्यांची माहिती अपलोड करण्यासाठी शाळेत ईमेल पाठवला जाईल.
विद्यार्थ्यांची माहिती खालीलपैकी कोणत्याही प्रकारे अपलोड केली जाऊ शकतो:
A. शाळेद्वारे:
http://school.scholarship.dakshana.org येथे (नोंदणीकृत शाळांवर क्लिक करा)
किंवा
B. विद्यार्थ्यांद्वारेः apply http://apply.scholarship.dakshana.org येथे
JDST नोंदणी प्रक्रियेबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, व्हिडिओ येथे पहा:
https://youtu.be/ihBrijN36rg

https://youtu.be/ihBrijN36rg

 


JDST एप्रिल 2021 मध्ये आपल्या जिल्हा / राज्यातील नियुक्त ठिकाणी घेण्यात येईल. कृपया पुढील माहिती किंवा स्पष्टीकरणासाठी आमच्याशी संपर्क साधावा (+91.95619.45427).

या संदर्भातील कार्यालयाचे पत्र-

दक्षिणा एज्युकेशन ट्रस्ट यांचे पत्र

 

नवनवीन शैक्षणिक आपडेट्स साठी आमच्या fb पेज ला लाईक कराhttps://www.facebook.com/DnyanSanvad-105728171462266/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here