आश्रमशाळांचा निकाल कमी लागल्यास वेतनवाढ होणार बंद

256

शासकीय आश्रमशाळा / अनुदानित आश्रमशाळेत विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीबाबत.

अतिदुर्गम व डोंगराळ भागात राहणा-या अनुसूचित जमातीच्या लोकांच्या आर्थिक शैक्षणिक व सामाजिक विकास जलदगतीने घडवून आणण्यासाठी सन १९७२-७३ पासून शासनाने निवासी आश्रमशाळा समूह योजना कार्यान्वित केलेली आहे. ही योजना मुख्यत्वे अतिदुर्गम डोंगराळ व पाडयातील आदिवासी मुला / मुलींमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करुन शैक्षणिकदृष्टया त्यांना सुशिक्षित करणे व त्यायोगे त्यांचे जीवनमान उंचावणे या उददेशाने राबविण्यात येते. शिक्षणाची ज्ञानगंगा द-याखो-यात, दुर्गम पाडयात पोहचविण्याचे काम शासकीय आश्रमशाळांमार्फत होत आहे. मात्र, इ. ७ वी पर्यंत असलेल्या शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थी इ. ७ वी उर्तीर्ण झाल्यानंतर पुढील इयत्तेमध्ये प्रवेश घेतांना त्यास अनेक अडचणींना सामोरे जावे लागते किंवा इयत्ता ८ वी मध्ये प्रवेश न मिळाल्यास तो विद्यार्थी शाळाबाहय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यास्तव पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.

i) ) ज्या ठिकाणी इ. ७ वी पर्यंतच शासकीय आश्रमशाळा आहेत, अशा आश्रमशाळेतील विद्यार्थी इ. ७ वी मध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर त्यास नजीकच्या शासकीय आश्रमशाळा / अनुदानित आश्रमशाळेमध्ये प्रवेश देण्यात यावा. ज्याप्रमाणात विद्यार्थी संख्या वाढेल त्या वाढीव विद्यार्थी संख्येस मान्यता देण्यात येत आहे.

ii) इ. ७ वी मध्ये उत्तीर्ण झालेला विद्यार्थी पुढील वर्गात प्रवेश न मिळाल्यास तो विद्यार्थी शाळाबाहय होणार नाही याची दक्षता इ. ७ वी पर्यंत असलेल्या आश्रमशाळेतील मुख्याध्यापक यांनी घ्यावी.

(ii) शासकीय आश्रमशाळा व अनुदानित आश्रमशाळांचे मुख्याध्यापक व विषय शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाकडे दुर्लक्ष करीत असल्याने शासकीय व अनुदानित आश्रमशाळांतील विद्यार्थी हे पूर्णवेळ निवासी असूनही विद्यार्थांचा शैक्षणिक विकास असमानधानकारक असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे ज्या शासकीय आश्रमशाळा व अनुदानित आश्रमशाळा आणि संलग्न कनिष्ठ महाविद्यालयांचा ० ते ५० टक्के निकाल लागला तर सबंधित शाळेचे मुख्याध्यापक व सबंधित विषयांचे शिक्षक यांच्या दोन वेतनवाढी तर ५१ ते ८० टक्के निकाल लागल्यास एक वेतनवाढ विहीत कार्यपध्दतीचा अवलंब करुन प्रकरण परत्वे विशिष्ट कालावधी किंवा कायमस्वरुपी बंद करण्यात याव्यात.

(iv) शासकीय आश्रमशाळेत शिकत असलेला विद्यार्थी इ. १० व १२ वी मध्ये अनुतीर्ण झाला असल्यास, अशा विद्यार्थ्यांस इ. १० वी व इ. १२ वी ची फेरपरिक्षा होईपर्यंत किंवा पुढील वर्षाची परिक्षापर्यंत आश्रमशाळेतच ठेवण्यात यावे.

(v) सदर विद्यार्थ्यांस नापास झालेल्या विषयाशी सबंधित विषय शिक्षकाने मार्गदर्शन करावे व

सदर विद्यार्थी उतीर्ण होईल, अशी त्याची तयारी करुन घ्यावी.

(vi) आश्रमशाळेतील अधिक्षक / अधिक्षिका यांनी वरील इ. १० वी व इ. १२ वी मध्ये अनुतीर्ण झालेल्या विद्यार्थ्याचा अभ्यास करुन घ्यावा व याबाबत संनियंत्रण करावे.

(vii) उपरोक्त प्रवेशीत विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करण्यात याव्यात. ३. उपरोक्तप्रमाणे कार्यवाही करून आश्रमशाळेतील विद्यार्थी शाळाबाहय होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here