आता पवित्र पोर्टलद्वारे मुलाखतीस 1:10 ऐवजी 1:3 उमेदवार

151

शिक्षक भरती संदर्भात पवित्र पोर्टलव्दारे मुलाखतीसह विकल्पासाठी उमेदवारांची शिफारस करण्यासाठीचे प्रमाण १:१० ऐवजी १:३ असे सुधारीत करणेबाबत.

मुलाखतीसह विकल्प निवडलेल्या खाजगी व्यवस्थापनांच्या शाळांतील शिक्षण सेवकांच्या मुलाखतीद्वारे अंतिम निवडीसाठी प्रत्येक रिक्त शिक्षकीय जागेकरीता उपलब्ध असल्यास समांतर आरक्षणासह शासन निर्णय, दिनांक ७.२.२०१९ अन्वये विहीत केलेल्या १:१० प्रमाणाऐवजी १:३ या गुणोत्तराप्रमाणे उमेदवारांचा प्राथम्य क्रम, गुणानुक्रम, पदासाठीचे माध्यम, प्रवर्ग, विषय व बिंदूनामावलीनुसार उच्चतम गुणप्राप्त उमेदवारांची निवडसूची त्या व्यवस्थापनाच्या लॉगिनवर उपलब्ध करुन देण्यात येईल..

वाचा सविस्तर शासन निर्णय- 👇

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here