राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अनुषंगाने आणि २०२१ च्या अर्थसंकल्पीय घोषणेच्या अनुषंगाने केंद्र शासनाने दिलेल्या सूचनेनुसार प्रौढ शिक्षणाची एक नवीन योजना नवभारत साक्षरता कार्यक्रम सन २०२२-२३ ते २०२६ २७ या कालावधीत राबविण्याचा निर्णय शासनामार्फत घेण्यात आलेला आहे. सदर योजनेचा कालावधी १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२७ असा आहे. सदर योजना केंद्र व राज्यशासन यामधील सर्व जिल्ह्यांमधील ग्रामीण व शहरी या दोन्ही भागात लागू करण्यात आलेली आहे.
ऑनलाईन सर्वेक्षणासाठी मोबाइल अॅप विकसित करण्यात आले आहे. सर्व क्षेत्रीय अधिकारी यांचे सदर मोबाइल अॅपचे प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने युट्युब लाईव्हद्वारे दि. २ जून २०२३ रोजी सकाळी ११:३० वाजता आयोजित करण्यात आले आहे. सबब आपण व आपले अधिनस्थ असणारे नवभारत साक्षरता योजनेचे काम पाहणारे अधिकारी व कर्मचारी तसेच शालेय स्तरावरील सर्व पर्यवेक्षकीय यंत्रणा, शालेय मुख्याध्यापक व शिक्षक यांनी सदर प्रशिक्षणासाठी उपरोक्त कालावधीत ऑनलाईन पद्धतीने युट्युब लाईव्ह या समाज माध्यमावर उपस्थित राहावे.
( रमाकांत काठमोरे)
सहसंचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण
परिषद, महाराष्ट्र पुणे – ३०