दि. २० ऑगस्ट, २०२२ हा दिवस “सद्भावना दिवस व दि. २० ऑगस्ट, २०२२ ते दि. ५ सप्टेंबर, २०२२ हा पंधरवडा “सामाजिक ऐक्य पंधरवडा ” म्हणून साजरा करण्याबाबत.

172

युवा व क्रिडा मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांच्या निदेशानुसार दिवंगत पंतप्रधान मा.राजीव गांधी यांचा जयंती दिवस २० ऑगस्ट हा दिवस दरवर्षी “सद्भावना दिवस” म्हणून साजरा करण्यात येतो. तसेच मानव संसाधन विकास मंत्रालय, भारत सरकार यांच्या कार्यालयीन ज्ञापन क्र.एफ-२८-२२/२००६-वा. एस-४, दि. १८ जुलै, २००६ अन्वये देण्यात आलेल्या निदेशास अनुसरुन, उपरोक्त सद्भावना दिवसाच्या अनुषंगाने दि. २० ऑगस्ट, २०२२ ते दि ५ सप्टेंबर, २०२२ हा पंधरवडा “सामाजिक ऐक्य पंधरवडा ” म्हणून साजरा करण्याचे शासनाने ठरविले आहे. राज्यातील विविध प्रदेशातील अनेक धर्मांच्या व अनेक भाषा बोलणाऱ्या लोकांमध्ये एकमेकांविषयी ऐक्याची भावना, सौहार्द भाव वृध्दीगंत करणे व हिंसाचार टाळणे ही प्रमुख उद्दीष्ट्ये पंधरवडा साजरा करण्यामागे आहेत. दि. २० ऑगस्ट, २०२२ हा “सद्भावना दिवस” म्हणून साजरा करण्यासाठी खालीलप्रमाणे कार्यक्रमआयोजित करण्यात यावेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here