मा. श्री.हिरालाल सोनवणे साहेब,आयुक्त,आयुक्तालय नाशिक तसेच मा.श्री सुदर्शन नगरे साहेब उपायुक्त,अपर आयुक्त कार्यालय नाशिक यांना प्राथमिक शिक्षक कर्मचाऱ्यांच्या देय असलेली पदवीधर प्राथ. शिक्षक व माध्यमिक शिक्षक या पदासाठी ची पदोन्नती रखडलेली जलद गतीने व्हावी व प्राथमिक शिक्षकांना न्याय मिळावा या मागणीसाठी चर्चा करताना व निवेदन देताना शासन मान्य आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस श्री. संजय जाधव व राज्य कार्याध्यक्ष श्री.सुभाष बावा व इतर सर्व संवर्गातील सभासद कर्मचारी उपस्थित होते.
कर्मचाऱ्यांनी आपल्या निवेदनातील प्रमुख मागणी अनुषंगाने ज्या मुद्द्यांवर त्यानुसार जून -2021 ची रखडलेली प्रलंबित पदोन्नती प्रक्रिया मे 2022 सत्र अखेर, आणि बदली प्रक्रिये अगोदर पूर्ण करण्याचे आश्वासन देऊन मा आयुक्त श्री.हिरालाल सोनवणे साहेब, व मा.उपायुक्त श्री.सुदर्शन नगरे साहेब यांनी सकारात्मक प्रतिसाद आश्वासन दिले. यासाठी शासनमान्य आदिवासी विकास संघटनेचे सरचिटणीस मा. श्री.संजय जाधव, निरिक्षक, विभागीय उपाध्यक्ष मा.श्री.गोकुळ राव, यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले, सर्व एकूण सातही प्रकल्पातील प्राथमिक व पदवीधर प्राथमिक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित राहून एकतेची वज्रमूठ दाखवली.