विद्यार्थांना मिळणार डीटीएच चॅनेल द्वारे शिक्षण

204

आता पहिली ते बारावीच्या दिव्यांग विद्यार्थांना मिळणार डीटीएच चॅनेल द्वारे शिक्षण


(प्रभाकर कोळसे)हिंगणघाट :

पहिली ते बारावीच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना डीटीएच चॅनेल द्वारे शिक्षण देणार असल्याची माहिती राज्य सरकारच्या वतीने हायकोर्टात देण्यात आली आहे. दिव्यांग तसेच गतिमंद विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी राज्य सरकार पुरेपूर काळजी घेत आहे या मुलांना १२ डीटीएच चैनल द्वारे शिक्षण दिले जाणार आहे. याचा फायदा दिव्यांग गतिमंद विद्यार्थ्यांबरोबर सर्वसामान्य मुलांनाही होणार आहे.अशी माहिती राज्य सरकारच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली. राज्य सरकारच्या वतीने एडवोकेट रीना साळुंके यांनी अशी माहिती दिली की शैक्षणिक सत्राची सुरुवात जुन -जुलै दरम्यान होणार असून दिव्यांग गतिमंद विद्यार्थ्यांना बारा डीटीएच चॅनेल द्वारे शिक्षण देण्यात येणार आहे.यात राज्य शिक्षण मंडळाच्या पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमाचा समावेश असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here