प्रभाकर कोळसे,वर्धा
राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. वर्षा गायकवाड यांनी नाशिक येथे बोलताना येणाऱ्या काळात पहिली आणि दुसरीचा अभ्यासक्रम बदलणार असल्याची माहिती दिली.
वर्षा गायकवाड यांनी नाशिक येथे बोलताना येणाऱ्या काळात पहिली आणि दुसरीचा अभ्यासक्रम बदलणार असल्याची माहिती दिली. आंतरराष्ट्रीय आणि सीबीएसईच्या (CBSE) धर्तीवर झेडपी च्या शाळांमधून शिक्षण देणार असल्याचं वर्षा गायकवाड म्हणाल्या. मुलांना थोर पुरुषाच्या इतिहासाची ओळख करून दिली जाणार असल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितले
पहिली दुसरीचा अभ्यासक्रम आंतरराष्ट्रीय आणि सीबीएसईच्या धर्तीवर असणार.
वर्षा गायकवाड यांनी येणाऱ्या काळात पहिली आणि दुसरीचा अभ्यासक्रम बदलला जाणार असून तो आंतरराष्ट्रीय आणि सीबीएसईच्या धर्तीवर झेडपी च्या शाळांमधून शिक्षण देणार आहे, अशी माहिती दिली.
महापुरुषांच्या इतिहासाची ओळख करुन देणार, मुलांना थोर पुरुषाच्या इतिहासाची ओळख करून दिली जाणार असल्याचं वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत. शाळांमध्ये ग्रंथोत्सव आणि शिक्षण उत्सव सुरू करणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली. शालेय शिक्षण विभाग प्रत्येक घराशी सबंधित विषय आहे. शाळांमध्ये शनिवार हा पुस्तक विरहित असावा,छंद जोपासण्यासाठी वेळ देणार असल्याचं वर्षा गायकवाड म्हणाल्या.