शशिकांत इंगळे,अकोला
वार्ताहर: गेल्या काही दिवसा आधी शाळा बंदीबाबत शासनाने निर्णय दिला होता. ह्या शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय असून तो नंतर 15 फेब्रुवारी पर्यंत ऑनलाईन शिक्षण घेऊन शाळा सुरू ठेवावे असा निर्णय घेण्यात आला होता. सुप्रिया सुळे यांनीसुद्धा टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्याबाबत मागणी केली होती. परंतु आता शालेय शिक्षण मंत्री माननीय बच्चू कडू यांनी मुख्य सचिव यांना पत्र लिहून शाळा सुरू करणे बाबत पत्र दिले आहे. यावर निर्णय शासनाकडून लवकरच देण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
कोरोनाची लाट ओसरली असल्याने मागील तीन दिवसाच्या आकळेवारीवरून दिसत आहे. त्यामुळे शाळा चालू करणे बाबत अनेक मागण्या होत आहेत. याच बाबींचा विचार करून माननीय शालेय शिक्षण मंत्री बच्चू कडू यांनी याबाबत शासनाकडे प्रस्ताव ठेवला आहे. गाव तसेच जिल्हा पातळीवर शाळा चालू करण्याबाबत निर्णय घ्यावा. स्थानिक प्रशासनाने याची अंमलबजावणी करावी व शासनाने लवकर निर्णय घ्यावा. जेथे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आहे तेथे लवकर शाळा सुरू कराव्यात असे ते म्हणाले.