शशिकांत इंगळे, अकोला
वार्ताहर : गेल्या दोन वर्षांत जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्याने सर्व अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व व्यवसायांना मोठे आर्थिक नुकसानेला सामोरे जावे लागले आहे. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे कोरोना निर्बंध शितील करण्यात आले होते आणि त्यामुळे शाळा सुद्धा सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र पुन्हा एकदा देशाच्या राजधानी दिल्लीमध्ये कोरोना बाधितांचे संख्येत झपाट्याने वाढ झाल्याने पुन्हा एकदा शाळा बंद होणार आहेत. प्रशासनाच्या माहितीनुसार, कोरोनाचा पॉझिटिव रेट दोन दिवसांमध्ये 0.5 टक्क्यांनी वाढत आहे.
यामुळे शाळा कॉलेजेस बंद करण्यात आल्या आहेत. कोरोना बाधितांची संख्या 25 डिसेंबरला 0.43 टक्क्यांनी वाढली होती. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी न झाल्यास संपूर्ण शाळांना कुलुप लावण्यात येणार आहे.
शहरातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या आणि हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या रुग्णांची संख्या च्या आधारे सरकार प्रतिबंध लागू करणार आहे. माहितीनुसार राजधानी दिल्लीमध्ये 27 डिसेंबर 2021 पासून शाळा सुरू होणार होत्या. मात्र अशा परिस्थिती मध्ये ज्युनिअर चे वर्ग पुन्हा सुरू होतील की, नाही की अजून वाट पहावी लागणार, याबाबत शंका आहे. दिल्ली मधील सीनियर वर्ग हे 18 डिसेंबरपासून सुरू करण्यात आले होते मात्र कोरोना बाधितांचे संख्या आणि वायू प्रदूषण यामुळे पुन्हा शाळा बंद करण्यात आली आहे.