शशिकांत इंगळे,अकोला
वार्ताहर: ओमायक्रॉनचा संसर्ग मोठ्या प्रमाणात असला तरी सुद्धा राज्यातील शाळा सरसकट बंद करणार नाही. असे मत शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी बुधवारी स्पष्ट केले आहे.
घनसोली येथील अठरा विद्यार्थी वायरसने बाधित झाल्याने ती शाळा सील करण्यात आली होती. अशी परिस्थिती असल्यास तेथील स्थानिक प्रशासनाला निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. परंतु असे असताना राज्यात संपूर्ण शाळा बंद करण्याची बातमी पसरत होती परंतु यावर स्पष्टीकरण देताना वर्षा गायकवाड यांनी बुधवारी सरसकट शाळा बंद होणार नाहीत असे प्रतिपादन केले आहे.
अशा परिस्थितीत शासनाने SOP दिलेले आहेत. त्याचे पालन करून स्थानिक प्रशासन म्हणजे शिक्षण अधिकारी, आयुक्त आदी अधिकारी यांनी त्याबाबत निर्णय घ्यावा असे वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले.