माध्यमिक शिक्षकांची होणार कनिष्ठ महाविद्यालय पदोन्नती.

504

शशिकांत इंगळे,अकोला

वार्ताहर: माध्यमिक शिक्षकांनी उच्च शैक्षणिक अहर्ता प्राप्त केल्यास माध्यमिक शिक्षकांना कनिष्ठ महाविद्यालयात पदोन्नती देण्याचा मार्ग आता शासनाने मोकळा केला आहे. याबाबत शासनाने 1981 अधिनियमामध्ये महत्त्वाचे बदल करून आता शिक्षकांना मोठा दिलासा मिळवून दिला आहे.
1981 अधिनियमाप्रमाणे प्राथमिक शिक्षकांना माध्यमिक शाळेत पदोन्नती देता येत होती आणि माध्यमिक शाळेमधून अध्यापक विद्यालयात ही पदोन्नती देता येत होती, परंतु माध्यमिक शाळेतील शिक्षकांना उच्च माध्यमिक महाविद्यालयात पदोन्नती देण्याकरीता उपसंचालक यांच्याकडून मान्यता दिली जात नसल्याने. त्यामुळे हजारो शिक्षक या पासून वंचित होते. याबाबत माजी शिक्षक आमदार प्रा. श्रीकांत देशपांडे यांनी गेल्या दोन वर्षापासून पाठपुरावा करीत होते.
अध्यापक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय ही पदे समकक्ष आहेत. यांचा वेतन श्रेणी सुद्धा समान आहे. त्यामुळे माध्यमिक स्तरांवरून उच्च माध्यमिक स्तरावरील पदोन्नती नियमानुसार योग्य ठरत असल्याचा युक्तिवाद प्रा. श्रीकांत देशपांडे यांनी केला. मात्र 1981 च्या अधिनियमाप्रमाणे ‘उच्च माध्यमिक’ या शब्दाबाबत स्पष्टता नसल्याने पदोन्नती देणेबाबत संदिग्धता निर्माण झालेली होती. अखेर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने 17 डिसेंबर रोजी शासन नियम निर्गमित करुन माध्यमिक शाळेतील शिक्षकांना उच्च माध्यमिक स्तरांवर पदोन्नती देण्याचा मार्ग मोकळा करून दिला आहे.
अशा बदल्या सातव्या वेतन आयोगानुसारच उच्च माध्यमिक वेतनश्रेणी दिली जाणार आहे. असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here