राज्यस्तरीय इंस्पायर अॅवार्ड साठी शुभम इदेची निवड…!

222

आदिनाथ सुतार,राजूर:-

विद्यानिकेतन च्या धर्तीवर आदिवासी विकास विभागाच्या वतीने 1990च्या दशकात महाराष्ट्रातील आदिवासीतील हूशार, प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना गुणवत्तापुण॔ शिक्षण मिळावे म्हणून सुरू करण्यात आलेल्या.मवेशी शैक्षणिक संकुल येथील शासकीय आदर्श आश्रमशाळा भंडारदरा कॅम्प मवेशी, ता.अकोले जि.अ.नगर या शाळेचा विद्यार्थी शुभम अशोक इदे या विद्यार्थ्याच्या “कापुस वेचनी यंत्र”(काॅटन पिकर मशिन)या विज्ञान उपकरणांची राज्यस्तरीय इन्स्पायर अॅवाॅड॔साठी निवड होऊन आश्रमशाळा शैक्षणिक विकासाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवुन नेत्रदिपक यश मिळवले आहे.
महाराष्ट्रातील सर्वदूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी राज्यातून इन्पायर अॅवाॅड॔ विज्ञान प्रदर्शन 2020-21 मध्ये सहभाग नोंदवला होता यातूनच अहमदनगर जिल्ह्यातून 213 विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनात सहभाग घेतला होता यातून
21 विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावरून राज्यस्तरीय इन्पायर अॅवाॅड॔ प्रदर्शनासाठी
निवड झाली आहे कोरोनाच्या काळात आश्रमशाळा विद्यार्थ्यांचे शिक्षण अँड्रॉइड मोबाईल नाही, रेंज नाही यासह विविध समस्यांच्या गर्तेत सापडले होते परंतु आश्रम शाळा शिक्षकांनी ग्रहभेटीद्वारे मुलांच्या शिक्षणासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करून विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्याचे आव्हान लिलया पेलले व यातूनच विविध शैक्षणिक उपक्रम राबवून मुलांच्या सर्जनशिलतेला वाव दिला गेला. यातूनच शुभम इदेसारखे बालवैज्ञानिक आपल्या विज्ञान दृष्टीचा ठसा महाराष्ट्राच्या शैक्षणिक वर्तुळात उमटवीत असल्याचे गौरवोद्गार आदर्शचे कुलप्रमुख श्री.भाऊसाहेब खरसे यांनी शुभमच्या यशाविषयी बोलताना व्यक्त केले.
शुभमला शाळेतील विज्ञान शिक्षक श्री. जगन्नाथ जाधव व अंकुश चावडे यांनी मार्गदर्शन केले होते.शुभमच्या यशाबद्दल प्रकल्प अधिकारी श्री राजेंद्र भवारी , प्राचार्य देवीदास राजगिरे,शिवराज कदम, श्री आदिनाथ सुतार ,मारूती लहामटे, सुमन सहाणे यांनी शुभमचे कौतुक केले असून शैक्षणिक संकुल मवेशी येथील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी शुभमच्या यशाबद्दल त्याचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here