Whatsapp वरील मेसेज डिलीट करून कंटाळलात! अशी सेटिंग केल्यास 24 तासांनी आपोआपच डिलीट होतील मेसेजेस.

321

सतीश लाडस्कर, भंडारा

    आजकाल Whatsapp या माध्यमाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. आपल्यापैकी बरेच जण अनेक व्हाट्सऍप ग्रुप वर जोडले गेलेले असतात. या ग्रुपवर दिवसभरात शेकडो मेसेजेस येत असतात. त्यापैकी काही आवश्यक तर बरेच मेसेज हे अनावश्यक सुद्धा असतात. हे मेसेज डिलीट करताना आपल्याला बराच त्रास होतो आणि आपला बराच वेळ खर्ची लागतो.
     हा त्रास टाळण्यासाठी Whatsapp ने वापरकर्त्यांसाठी एक नवीन फिचर उपलब्ध करून दिलेले आहे. या फिचरचे नाव आहे डीसअप्पियरींग मेसेजेस (Disappearing Messages). हे फिचर तसे जुनेच आहे, परंतु या फिचर मध्ये मेसेजेस आपोआप डिलीट करण्याचा कालावधी हा 7 दिवसांचा होता. तो कालावधी आता, 24 तास, 7 दिवस आणि 90 दिवस अशा तीन पर्यायांमध्ये उपलब्ध करून दिलेला आहे. या फिचरचा वापर केल्यामुळे आपण ज्या पद्धतीची सेटिंग डीसअप्पियरींग मेसेजेस मध्ये करून ठेवली असेल, तेवढ्या कालावधीमध्ये सदर चॅट वरील किंवा ग्रुप वरील मेसेजेस आपोआप डिलिट होतील व आपल्याला होणारा त्रास व लागणारी वेळ या दोन्हीची बचत होईल. हे फिचर कसे वापरायचे याबद्दल खाली सविस्तर माहिती दिलेली आहे हे.

★ Disappearing Messages हे फिचर वापरण्यासाठी 👇खालील स्टेप्स फॉलो करा.

● सर्वप्रथम प्ले स्टोअर वरून आपले Whats app अपडेट करून घ्या.

● त्यानंतर व्हाट्सऍप ओपन करा.

● आता ज्या चॅट वरील किंवा ग्रुप वरील Disappearing Messages सेटिंग करायची आहे ती चॅट किंवा ग्रुप ओपन करा.

●आता चॅट किंवा ग्रुप च्या प्रोफाईलवर (नावावर) क्लिक करा.

● वर स्क्रॉल केल्यावर त्या ठिकाणी Disappearing Messages असा एक पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.

● आता आपल्यासमोर, 24 तास, 7 दिवस आणि 90 दिवस आणि Off असे चार पर्याय दिसतील त्यापैकी आपल्याला हवा तो पर्याय निवडा. ( सुरुवातीला Off ही डिफॉल्ट सेटिंग असते.)

● अशाप्रकारे सेटिंग करून व्हाट्सऍप वरील मेसेजेस तीनपैकी आपल्याला हव्या त्या कालावधीत आपोआप डिलीट करता येतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here