शशिकांत इंगळे,अकोला
वार्ताहर: महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या हिवाळी परीक्षा आता ऑनलाईन पद्धतीनेच घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या परीक्षा बहुपर्यायी स्वरूपाचे असून 18 जानेवारी ते 9 फेब्रुवारी दरम्यान तर प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा देखील ऑनलाईन पद्धतीने 3 जानेवारी ते 15 जानेवारी दरम्यान घेतल्या जाणार असल्याचे MSBTE ने जाहीर केले आहे. MSBTE यांच्या कडून जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार अभियांत्रिकी व फार्मसीच्या लेखी परीक्षापूर्वी अभ्यासक्रमाच्या प्रत्यक्ष परीक्षा होणार आहेत. विद्यार्थ्याला परीक्षेमध्ये 40 पैकी किमान 35 प्रश्न सोडवणे बंधनकारक असणार आहे. विद्यार्थ्यांना घरून परीक्षा देणे शक्य नसल्यास आपल्या जवळच्या पॉलिटेक्निक संस्थेमध्ये विनंती केल्यास संस्थेकडून सोय उपलब्ध करून देण्याचे निर्देश सुद्धा संस्थांना देण्यात आलेले आहेत. यासोबतच प्रत्यक्ष परीक्षा ऑनलाईन पद्धतीने आणि तोंडी परीक्षा ह्या विविध मोबाईल ॲप चा वापर करून संस्था स्तरावर घेण्यात यावे. अश्या सूचना मंडळाने दिलेल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या परीक्षा ह्या टेलिफोनिक पद्धतीने सुद्धा घेतले जाऊ शकतात. अशी सूचना मंडळाचे सचिव डॉ. महेश चितलांगे यांनी दिली आहे.
▫️प्रात्यक्षिक परीक्षा – ३ ते १५ जानेवारी
▫️ऑनलाईन लेखी परीक्षा – १८ जानेवारी ते ९ फेब्रुवारी
▫️पहिले आणि तिसरे सत्र नवीन प्रवेशित विद्यार्थी
▫️प्रात्यक्षिक परीक्षा – १० ते १५ जानेवारी
▫️ऑनलाईन लेखी परीक्षा – १८ जानेवारी ते ९ फेब्रुवारी