शिक्षकांनी शाळेत येण्यासाठी सायकलचा वापर करावा; यवतमाळ जिल्हा परिषदेचा अनुकरणीय उपक्रम

268

प्रभाकर कोळसे हिंगणघाट ( वर्धा)
लहानपणी बऱ्याच लोकांनी सायकल चालवली असेल, एकेकाळी गावशहरात प्रतिष्ठीत असलेली सायकल अडगळीत पडली.वाढती लोकसंख्या, शहरीकरण दर्जा आदी मुळे गावशहरात दुचाकी, चारचाकी वाहनाची वर्दळ वाढली आणि प्रदुषणानेही उच्च पातळी गाठली असल्याचे निदर्शनास येते. प्रदुषणाच्या वाढते पातळीने नागरीकांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते.यावर आळा घालण्यासाठी म्हणुन यवतमाळ जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी शाळेत सायकलने जा – ये‌ करावे असा ठराव जिल्हा परिषद शिक्षण समीतीने घेतला आहे.यातुन पर्यावरण संतुलन, पेट्रोल बचत, सायकलींग व्यायामामुळे सुदृढ होणारे आरोग्य याचा सारासार विचार करून यवतमाळ जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांनी शाळेत जाताना सायकल घेऊन शाळेत जावे असा ठराव जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीने घेतला आहे.
तालुक्याच्या ठिकाणी राहणाऱ्या आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या शिक्षकांनी घरापासून शाळा जवळ असल्यास त्यांनी सायकल घेऊन शाळेत जावे असा निर्णय शिक्षण समितीने घेतला आहे.

हा उपक्रम शिक्षकांच्या आरोग्यासाठी फायदेशीर तद्वतच पर्यावरण संतुलन राखण्यासाठी मदत करणारा असल्याचे मत राज्यातील शिक्षक व्यक्त करताहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here