(MAHA TET) महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021 अंतरीम उत्तरसूची प्रसिद्ध

307

दिनांक 29 नोव्हेंबर 2021 रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात आली होती. शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्र. 1 पेपर क्र. 2 ची अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

पेपर 1 उत्तरसूची डाऊनलोड करण्यासाठी 👉 click here

पेपर 2 ( Math- science) उत्तरसूची डाऊनलोड करण्यासाठी 👉 click here

पेपर 2 ( Social- science) उत्तरसूची डाऊनलोड करण्यासाठी 👉 click here

परीक्षेच्या पेपर क्र. १ व पेपर क्र. २ बाबत प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तराबाबत आक्षेप असल्यास ते परीक्षा परिषदेकडे दि.०८/१२/२०२१ अखेरपर्यंत पाठवता येतील. सदर आक्षेप/त्रुटी बाबतचे निवेदन http://mahatet.in या संकेतस्थळावर परीक्षार्थ्याच्या लॉगीन मध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आक्षेप नोंदणी या लिंकद्वारे परिषदेकडे पाठविता येतील. आक्षेपाबाबत लेखी निवेदन समक्ष टपालाने/ ईमेलद्वारे पाठविल्यास त्याचा विचार केला जाणार नाही.

(विहित मुदतीत ऑनलाईन रित्या प्राप्त झालेल्या आक्षेपाचा विचार करुन विषय तज्ञांच्या अभिप्रायानुसार अंतिम उत्तरसुची यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल, याची उमेदवारानी नोंद घ्यावी.)

असे परिषदेमार्फत पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here