Google देणार ₹74000/- शिष्यवृत्ती; अंतिम मुदत लवकरच संपणार आहे

279

शशिकांत इंगळे,अकोला

नेटवर्क: गुगलने तांत्रिक क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या मुली आणि महिलांकरिता शिष्यवृत्ती देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. त्या शिष्यवृत्तीचे नाव त्यांनी गुगल शिष्यवृत्ती असे ठेवले आहे.
गुगलचे म्हणणे आहे की, शिष्यवृत्तीचे पैसे विद्यार्थ्याच्या शिक्षणादरम्यान लागणाऱ्या शिकवणी शुल्क, पुस्तके तसेच इतर शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी केला जाईल.
या मुली किंवा महिलांनी शिष्यवृत्ती मिळण्यासाठी अर्ज केले नाही त्यांनी लवकर अर्ज करावा असे आवाहन गुगल कडून करण्यात आले आहे. कारण अर्ज करण्याची अंतिम तारीख जवळ आली आहे. सध्या ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ची प्रक्रिया सुरू आहेत.

किती मिळणार गुगल शिष्यवृत्तीची रक्कम

▫️गूगल शिष्यवृत्ती योजनेसाठी ₹74000/- स्कॉलरशिप दिली जाणार आहे. त्याकरिता ऑनलाईन अर्ज करावा लागेल.

अर्ज करण्याची अंतिम दिनांक कोणती.

▫️ज्यांना या शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करायचा आहे. त्यांनी तारखेच्या पूर्वी अर्ज करावा. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 10 डिसेंबर 2021 (11.59pm) आहे.

शिष्यवृत्ती साठी पात्रता.

▫️गुगल शिष्यवृत्ती 2022 साठी अर्ज करण्यासाठी केवळ महिलांनाच पात्र समजले जाईल. तथापि त्यांनी पुढील पात्रता पूर्ण करणे बंधनकारक आहे.

▫️2021-22 शैक्षणिक सत्रात नियमित विद्यार्थी म्हणून प्रवेश घेतलेला असते आवश्यक आहे.

▫️ कॉम्प्युटर सायन्स, कॉम्प्युटर इंजिनीअरिंग किंवा अशा संबंधित तांत्रिक शिक्षण घेत असलेल्या मुली किंवा महिला पात्र असतील.

▫️महिलेची शैक्षणिक प्रगती चांगली असावी.

❓शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची पद्धत.

▫️ गुगल शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने या http://buildyourfuture.withgoogle.com अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. यावर तुम्हाला शिष्यवृत्ती संबंधित सर्व माहिती मिळेल.

▫️ वेबसाईटवर जाऊन होमपेज वर Scholarship पर्यायावर क्लिक करा.

▫️ त्यानंतर, Generation Google Scholarship या पर्यायावर क्लिक करा.

▫️ या पानावर आपल्याला संपूर्ण माहिती उपलब्ध आहे. ही माहिती वाचून Apply Now या बटनावर क्लिक करा.

▫️ या पानावर आपली संपूर्ण माहिती भरा आणि Submit बटणावर क्लिक करून आपली शिष्यवृत्ती अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here