शशिकांत इंगळे,अकोला
दिल्ली सरकारच्या दिल्ली निगम अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी मोठ्या प्रमाणात सुधारणा आणि बदल करण्यात आलेले आहेत या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकविण्याकरिता वापरात येणारे तंत्रज्ञान आणि शिक्षकांकरिता असणाऱ्या सुविधा सोबतच विद्यार्थ्यांचे आचार-विचार व शिस्त तसेच शिक्षकांच्या शिकवणीची कार्यपद्धती या संबंधित सर्व गोष्टींचा सखोल अभ्यास केला जाणार.
वार्ताहर: राज्यातील जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक दर्जा वाढावा करिता शासनाने अभ्यासगट स्थापन करण्याचे आयोजिले होते. त्या अनुषंगाने दिनांक 14 सप्टेंबर 2021 रोजी ग्राम विकास विभागाने 7 तज्ञ मंडळींचा अभ्यास गट बनविल्या बाबत शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांचा शैक्षणिक दर्जा गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात सुधारलेला आहे. त्यामुळे या उत्कृष्ट शैक्षणिक दर्जाचा प्रभाव शाळेतील विद्यार्थ्यांवर दिसून येत आहे. महाराष्ट्रातील बऱ्याचजिल्हा परिषद शाळांना आय एस ओ नामांकन सुद्धा मिळविले आहे.
दिल्ली सरकारच्या दिल्ली निगम अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी मोठ्या प्रमाणात सुधारणा आणि बदल करण्यात आलेले आहेत या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकविण्याकरिता वापरात येणारे तंत्रज्ञान आणि शिक्षकांकरिता असणाऱ्या सुविधा सोबतच विद्यार्थ्यांचे आचार-विचार व शिस्त तसेच शिक्षकांच्या शिकवणीची कार्यपद्धती या संबंधित सर्व गोष्टींचा सखोल अभ्यास करून या बाबत अहवाल अभ्यास गट मा. राज्यमंत्री ग्रामविकास व मा. मंत्री ग्रामीण विकास महोदयांना सादर करणार आहेत. असे या शासन निर्णयामध्ये सांगितले आहे.