(पोषण आहार किट चे वाटप करताना मुख्य कार्यकारी अधिकारी श्री दिलीप स्वामी, यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्री जावेद शेख, गटविकास अधिकारी गणेश मोरे, किरण सुर्यवंशी व पर्यवेक्षक सौ सुवर्णा माशाळे इत्यादी.)
सोलापूर – राष्ट्रीय पोषण महिन्यातील विविध उपक्रमांचा लाभ घेऊन बालकांच्या उत्तम पोषणासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री दिलीप स्वामी यांनी केले. पापरी तालुका मोहोळ येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प मोहोळ अंतर्गत बीट पाटकुल मधील पापरी येथील अंगणवाडीत राष्ट्रीय पोषण महिना अंतर्गत विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री दिलीप स्वामी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्री जावेद शेख, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी श्री संजय कुमार राठोड, गटविकास अधिकारी श्री गणेश मोरे, बाल विकास प्रकल्प अधिकारी श्री किरण सूर्यवंशी गटशिक्षणाधिकारी श्री सिद्धेश्वर निम्बर्गी, उप अभियंता सुनील कटकधोंड, अंगणवाडी पर्यवेक्षिका सौ. सुवर्णा माशाळे शिक्षण विस्तार अधिकारी श्री हरीश राऊत व विकास यादव आदी यावेळी उपस्थित होते.
राष्ट्रीय पोषण महिना अंतर्गत यावेळी विविध उपक्रम घेण्यात आले. या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या पोषण साठी उपयुक्त विविध पाककृती प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री दिलीप स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बेबी केअर किट चे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे दत्तक बाल श्रेणी वर्धन योजनेअंतर्गत बालकांना आहार किट वाटप व शाळापूर्व तयारी उपक्रम चे आयोजन करण्यात आले होते. श्री स्वामी यांनी महिला व बालकल्याण विभागामार्फत सुरू असलेल्या विविध उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्री जावेद शेख यांनीही आपल्या मनोगतात राष्ट्रीय पोषण महिना व विभागाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
यावेळी मुख्याध्यापक श्रीकांत खताळ, विस्तार अधिकारी नंदकुमार बागवाले हे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अंगणवाडी सेविका सौ. शोभा भोसले, सौ. मीरा भोसले, सौ. जयश्री भोसले, सौ. शारदा टेकळे, प्रमिला माळवदकर, सौ प्रविणा वाघमारे, सौ शालन लोंढे, सौ सुनिता कसबे व दिपाली डोंगरे यांनी परिश्रम घेतले.