इको फ्रेंडली रक्षाबंधन

300

2021 -2022 या शैक्षणिक वर्षात जि. प. शाळा आगवन नवासाखरा,डहाणू शाळेतील विद्यार्थ्यांनी पर्यावरण पूरक इको फ्रेंडली राख्या बनवून साजरा केला रक्षाबंधनाचा सण.


कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अजूनही शाळा बंद आहेत परंतु शिक्षण मात्र सुरू आहे.ग्रामीण भागात ऑनलाइन शिक्षणा सोबत शासनाने निर्धारित केलेले कोविड 19 चे सर्व नियम पळून थोड्या प्रमाणावर वाड्या वस्त्यांवर जाऊन शिक्षकांमार्फत ऑफलाईन शिक्षण ही दिले जाते.
शालेय अध्यापनाला सण उत्सवाची जोड देणाऱ्या आगवन नवासाखरा शाळेच्या नवोपक्रमशील शिक्षिका सौ. शिल्पा वनमाळी मॅडम यांनी इको फ्रेंडली राख्यांची संकल्पना ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांच्या समोर मांडली .
प्लास्टिक ,कागद,कापूस यांसारखे टाकावू पदार्थ पावसाळ्यात नदी ,नाल्यात साचतात आणि त्यामुळे भूप्रदूषण,जलप्रदूषण ,वायूप्रदूषण होते ,पूर सदृश परिस्थिती निर्माण होते अशा महाभयंकर समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागू नये म्हणून जि. प .शाळा आगवन नवासाखरा शाळेतील विद्यार्थ्यांनी वनमाळी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली गहू ,तांदूळ पीठ ,फळांच्या ,फुलांच्या बिया ,कडधान्य ,नैसर्गिक रंग ,फुले,पाने यांचा वापर करून इको फ्रेंडली राख्या बनवण्याचा छोटासा प्रयत्न केला.
राख्या झाडांना बांधून निसर्ग व वृक्षांप्रति असणारी आपली जबाबदारी ओळखून विद्यार्थ्यांनी त्याच्या अंगणातील झाडांचे वृक्षबंधन व संवर्धन करण्याची शपथ घेतली.

राखी बनवण्यासाठी वापरलेले पीठ प्राणी अथवा पक्षांना खाऊ घालता येईल ,त्यावर सजावटीसाठी वापरलेल्या बिया,फुलांच्या पाकळ्या जमिनीत ,कुंडीत लावून नवीन रोपांची निर्मिती करता येईल ,लोकरीच्या धाग्याचा पुनर्वापर करता येईल ,त्यामुळे निश्चितच प्रदूषण मुक्त आणि इको फ्रेंडली रक्षाबंधन साजरी केल्याचे समाधान शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे.

नाविन्यपूर्ण उपक्रम सतत शाळेत राबविणाऱ्या सौ शिल्पा वनमाळी या पालघर जिल्ह्यातील नवोपक्रमशील शिक्षिका असून 2021 मध्ये झालेल्या “आम्ही नवोपक्रमशील शिक्षक” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here