25 ऑगस्टपर्यंत राज्यातील शाळा आणि महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
शालेय शिक्षण विभाग आणि टास्क फोर्स यांच्या संयुक्त बैठकीत चर्चा करून शाळा सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. टोपे यांनी पुण्यातील पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी सांगितले. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या सूचनेनुसार हा विभाग कुलगुरूंच्या संपर्कात आहे. त्यांच्या कार्यक्षेत्रातील महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात विद्यापीठाचे कुलगुरू यांचा अहवाल शिक्षण संचालक कार्यालयाकडे मागविण्यात येईल आणि त्या सर्व प्रक्रियेसाठी साधारणपणे पाच ते सहा दिवस लागतील असे त्यांनी सांगितले यामध्ये शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाई. तसेच राज्यांमध्ये डेल्टा व्हेरीएंट आढळत असले तरी, त्यांची लक्षणे सौम्या आहेत.
मात्र या विषाणूंचे संक्रमण अधिक करण्याची क्षमता विषाणू मध्ये आहे. केंद्र शासनाकडून लस उपलब्ध होत नसल्याने जास्तीत जास्त लसीकरण होत नाही. मात्र लसीकरणाचे राज्याची यंत्रणा किती सक्षम आहे हे 14 ऑगस्ट रोजी ज्या पद्धतीने विक्रमी लसीकरण झाले. त्यावरून स्पष्ट झाले आहे. असेही टोपे यांनी सांगितले.