दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनो
एक दोन दिवसात सीईटी चे वेळापत्रक
प्रभाकर कोळसे, हिंगणघाट
दहावीचा राज्य मंडळाचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे.मुल्यमापनावर आधारीत निकाल असल्याने निकालही शतप्रतिशत च्या जवळपास आहे.यंदा दहावीच्या परीक्षा कोरोनासंसर्गाचे पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आल्या होत्या.अकरावीच्या प्रवेशासाठी सीईटी चा राज्याच्या शिक्षण विभागाने घेतला आहेच. त्याअनुषंगाने माध्यमिक शिक्षण विभागातर्फे इयत्ता अकरावीची प्रवेशप्रक्रिया जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू केली जाणार असून त्याबाबतचे वेळापत्रक येत्या दोन ते तीन दिवसांत प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे राज्य मंडळातर्फे अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील मार्गदर्शक सूचना एक ते दोन दिवसात प्रसिध्द केल्या जाणार आहेत, अशी राज्याच्या शिक्षण विभागाची माहिती आहे.
या संदर्भात लवकरच वेळापत्रक प्रसिद्ध केले जाणार आहेत. माध्यमिक शिक्षण विभागातर्फे येत्या २६ ते २७ जुलैपासून महाविद्यालय नोंदणी व विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश अर्जातील पहिला भाग भरण्यासाठी उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याबाबतचे सविस्तर वेळापत्रक दोन ते तीन दिवसांत प्रसिद्ध केले जाणार आहे. तसेच सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा दुसरा भाग भरण्याची संधी दिली जाईल, असे शिक्षण अधिकाऱ्यांकडून. राज्य मंडळातर्फे अकरावी प्रवेशासाठी घेतल्या जाणान्या सीईटी परीक्षेचे वेळापत्रक एक ते दोन दिवसात प्रसिद्ध केले जाणार आहे. त्यामुळे प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना सीईटीची तयारी करावी लागणार आहे
@ सीईटी दहावीच्या अभ्यासक्रमावरच
सीईटी परीक्षा १० वी च्या अभ्यासक्रमावर आधारित असेल प्रश्नपत्रिकेत इंग्रजी, गणित,विज्ञान,समाजशास्त्र या विषयावर प्रत्येकी २५ गुणांचे प्रश्न असतील. परीक्षेचे स्वरूप वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाची असून ही परीक्षा ओएमआर आधारित असेल.
माध्यमिक शिक्षण विभागातर्फे अकरावी प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील सविस्तर वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध केले जाणार आहे. त्यामुळे जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महाविद्यालय नोंदणी करणे व प्रवेश अर्जातील पहिला भाग भरणे ही प्रक्रिया सुरू होईल.–दिनकर टेमकर, प्रभारी संचालक, माध्यमिक शिक्षण, महाराष्ट्र राज्य