मिसाईल मॅन भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम साहेबांच्या ६ व्या स्मृती दिनानिमित्त राष्ट्रीय स्तरावर विविध स्पर्धांचे आयोजन

416

डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन तर्फे सहभाग घेण्याचे जाहीर आवाहन

स्पर्धेमध्ये किमान २५ विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदवणाऱ्या शाळा, विद्यालयाचे फाउंडेशनतर्फे स्वतंत्र प्रमाणपत्र देवून होणार गौरव

स्वतंत्र भारताचे ११ वे राष्ट्रपती मिसाईल मॅन भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलामांच्या दि. २७ जुलै २०२१ रोजी साजऱ्या होणाऱ्या ६ व्या स्मृती दिनानिमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध स्पर्धांचे राष्ट्रीय स्तरावर ऑनलाइन पद्धतीने विनामूल्य आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवण्याची शेवटची तारीख जवळ येत असल्याने डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन तर्फे जास्तीत जास्त संख्येने सक्रिय सहभाग घेण्याचे जाहीर आवाहन करण्यात येत आहे.
डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन व स्पेस झोन इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच मार्टिन ग्रुपच्या सहकार्याने आयोजित स्पेस रिसर्च पेलोड क्यूब्ज चॅलेंज २०२१ या प्रकल्पात दि. ७ फेब्रुवारी २०२१ रोजी तामिळनाडू राज्यातील रामेश्वरम् येथून भारतातील १००० बाल वैज्ञानिकांनी एकाच वेळी पूर्णपणे भारतीय बनावटीचे १०० लघु उपग्रह (पेलोड क्यूब्ज) बनवून हेलियम बलूनद्वारे अवकाशात सोडून एकाच वेळी गिनिज बुक ऑफ रेकॉर्ड, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, अशिया बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड व असिस्ट बुक ऑफ रेकॉर्ड आदी ५ जागतिक विक्रमांवर नाव कोरून नवा किर्तीमान स्थापित केला. यात महाराष्ट्रातील तब्बल ३९८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून सिंहाचा वाटा उचलला होता हे विशेष. या प्रकल्पाच्या यशस्वितेसाठी देशाचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी तसेच महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी फाउंडेशनच्या नावे सहभागी सर्वांना शुभेच्छा पत्र देवून गौरव केला आहे.
वरील विक्रम प्रस्थापित करणाऱ्या कलाम कुटुंबियांद्वारा रामेश्वरम् स्थित ‘हाऊस ऑफ कलाम’ येथून चालवल्या जाणाऱ्या डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन तर्फे आयोजित कलाम साहेबांच्या स्मृती दिनानिमित्त मागील वर्षी ३५००० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. यावर्षीही तितक्याच उत्साहाने ६ व्या स्मृती दिनाच्या स्मरणार्थ ऑनलाइन क्विज, चित्रकला व रेखांकन, वक्तृत्व, निबंध लेखन, प्रख्यात वैज्ञानिक व उद्योगपतींसोबत वेबिनार, डॉ. एपीजे अब्दुल कलाम इनोव्हेशन चॅलेंज डिझाईन कॉन्टेस्ट आदी विविध स्पर्धांचे ऑनलाइन पद्धतीने आयोजन करण्यात आले आहे. यात ऑनलाइन क्वीज ही डिजिटल ऑनलाइन विक्रम प्रस्थापित करणारी स्पर्धा आहे हे विशेष. या सर्व स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, पदक सोबतच भरघोष रोख पारितोषिके सुद्धा देण्यात येईल. तसेच उपक्रमातील प्रत्येक किंवा एका स्पर्धेमध्ये किमान २५ विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदवणाऱ्या शाळा, विद्यालयास फाउंडेशनतर्फे स्वतंत्र प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येणार आहे. स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविण्यासाठी फाउंडेशनच्या http://apjabdulkalamfoundation.org/6th-year-remembarance-day/competition-2021 या संकेतस्थळाचा आधार घ्यावा. अधिक माहितीसाठी ९४८६६६१९३१, ९६७७६४१३५१, ७४१८१३४३६५ व ०४५७३२२१९३१ या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच contact@houseofkalam.orgOffice@apjabdulkalamfoundation.org या ई-मेलचा वापर करावा. प्रत्येक स्पर्धां ह्या इ. २ री ते पदवीधर अशा विविध गटांमध्ये असून त्यानुसारच विजेत्यांची निवड केली जाईल.
ह्या केवळ स्पर्धा नसून संकट काळात प्रत्येक भारतीयांच्या उत्थानासाठी प्रदान करण्यात येणाऱ्या मानवतावादी मदतीचा भाग होण्यासाठी निश्चितच प्रोत्साहित करणारा उपक्रम ठरेल. डॉ. कलाम साहेबांची विद्यार्थ्यांशी खूप जवळीकता होती. त्यामुळेच वरील उपक्रमातील विविध स्पर्धांमध्ये आपणा सर्वांचा सक्रिय सहभाग हीच कलाम साहेबांना खरी श्रद्धांजली ठरणार असल्याचे फाउंडेशनचे कोअर कमिटी सदस्य , ज्योती महाजन मॅडम ,नाशिक -जळगाव विभागीय समन्वयक वैशाली भामरे, सुशांत जगताप ,आदी पदाधिकाऱ्यांनी जाहीर आवाहन केले आहे.

ऑनलाइन क्विझ स्पर्धा

२७ जुलै रोजी भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या ६ व्या स्मृतिf दिनानिमित्त डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन , हाऊस ऑफ कलाम , रामेश्वरम यांनी ऑनलाईन प्रश्नमंजुषा करण्याचा निर्णय घेतला आहे. मुलांमध्ये राष्ट्रीय एकात्मता वाढविणे आणि त्यांना भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम 11 वें राष्ट्राध्यक्ष आणि देशाबद्दलचे त्यांचे योगदान इत्यादींच्या संदर्भात जागरूक करणे हे मुख्य उद्दीष्ट आहे.

पात्रता- २ री ते पदवीधर, इंजिनिअर , डिप्लोमा ( विविध गट)

नाव नोंदणी ची शेवटची तारीख – २६जुलै २०२१

अधिक माहिती सोबत जोडलेल्या बॅनर मध्ये दिलेली आहे.

नाव नोंदणी साठी पुढील लिंक – http://www.apjabdulkalamfoundation.org/6th-year-remembarance-day/registerform?name=quiz

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here