प्राथमिक स्तरावर पुस्तकातील भाषेची सक्ती न करता शिक्षण देणारी ग्राममंगल संस्था- आदरणीय श्रीमती सुषमाताई पाध्ये

299

   भारतीय स्त्री शिक्षणाचा पाया रोवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त विशेष परिसंवादात आधुनिक सावित्रींच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी दिनांक- ६ जानेवारी २०२० रोजी 'ज्ञानसंवाद' या ऑनलाइन शैक्षणिक व्यासपीठावरून साधलेला 'संवाद कोसबाडच्या टेकडीवरून...' या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.

परिसंवादात प्रमुख वक्त्या म्हणून ग्राममंगल संस्थेच्या श्रीमती सुषमा पाध्ये व डॉ.वर्षाताई कुलकर्णी उपस्थित होत्या.
ग्राममंगल संस्थेची स्थापना अनुताई वाघ व रमेश पानसे यांच्या पुढाकाराने झाली होती.ताराबाई मोडक व अनुताई वाघ यांच्या संकल्पनेतील नैसर्गिक साधनांतून प्रभावी बालशिक्षण रुजवण्यासाठी कोसबाडच्या आदिवासी वस्ती-वाड्यांवर सर्वप्रथम बालवाडी व अंगणवाडी ही संकल्पना उदयास आणली गेली.पुढे हेच शब्द व बालशिक्षणाची संकल्पना देशभर रूढ होत गेली.प्राथमिक स्तरावर पुस्तकातील भाषेची सक्ती न करता मुलांच्या बोलीभाषेतूनच शिक्षणाची खरी सुरवात ग्राममंगलम मधून केली जाते.ज्ञानरचनावादी शिक्षण पद्धतीचा प्रथम पुरस्कार ग्राममंगलनेच केला होता.
पाठ्यपुस्तकांना प्राधान्य न देता परिसरातून शिक्षण,जीवनातून शिक्षण,जीवनासाठी शिक्षण,जीवनासाठी शिक्षण असा शिक्षणप्रवास असायला हवा.अनुताई वाघ व ताराबाई मोडक यांनी कोणते कार्य केले यापेक्षा ते कार्य करण्यामागची त्यांची काय वृत्ती होती हे समजुन घेणे फार महत्वाचे आहे अशी प्रतिक्रिया डॉ.वर्षा कुलकर्णी यांनी दिली.
सुत्रसंचलन श्रीमती दिपाली आहेर यांनी केले तर आभार निलेश कासार यांनी मानले.युट्युब थेट प्रक्षेपणाद्वारे ‘Dnyan-sanvad’ या चॅनेल वरून हा कार्यक्रम प्रसारीत करण्यात आला होता.यासाठी विशेष तांत्रिक साहाय्य श्री. मिलींदजी पगारे सर यांचे लाभले तर निर्मिती ज्ञानसंवाद चे नितीन केवटे यांची होती.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मीडिया पार्टनर म्हणून तंत्रस्नेही शिक्षक समूह महाराष्ट्र चे मुख्य पर्यवेक्षक श्री कृष्णा कालकुंद्रीकर,विश्वांबर बोकडे,पंकज जगताप,विजय नेटके,प्रसिद्धी प्रमुख मधुकर घायदार,ब्लॉग प्रमुख सुनील बडगुजर सदाशिव अत्तरकार, गणेश कोठावळे,शर्मिला देसले,सुदर्शना नाईकनवरे,किशोर सोनवणे,भागवत भंगे,मन्साराम मेश्राम,सुधाकर आडे,विशाल पेचे,विपुल घोलप,खुशाल डोंगरवार,रवींद्र भोंग,अण्णा राठोड,विशाल चंदनखेडे,उमेश राठोड,गीतांजली गजबे,जया मुटके,विद्या बटवाल,संदीप शेंडे,निलेशकुमार इंगोले,वैभव चेके,संदीप वाघ,
रामसिंग राजपूत,रवींद्र कळंभे,हेमंत चोपडे,नेपाल वालदे,सुखदेव भालेराव,योगीता कराळे,सिद्धेश्वर गवळी,भागीनाथ पोटे, स्नेहा चिले, प्रकाश नारकर, साहेबराव मोहोड,कृष्णकुमार देशमुख, प्रविण बोरसे,संजीवनी काळे,सचिन कोकणे,मंगला एंडोले ,
यांचे सहकार्य लाभले.

1 COMMENT

  1. ज्ञानसंवाद हे आम्हा सामान्य शिक्षकांचे विचार व्यक्त करण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ बनले आहे. भविष्यात हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे डिजिटल व्यासपीठ असेल यात शंका नाही… या महान कार्यासाठी ज्ञानसंवाद प्रमुख आणि संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा 💐🙏

    रामसिंग पी. राजपूत
    शास.मा. आ. शाळा, देसगाव जि. नाशिक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here