संचालनालय, लेखा व कोषागारे, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे नियंत्रणाखाली असलेली वेतन पडताळणी पथकांकडून वेळोवेळी लागू केलेल्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार निर्गमित झालेल्या अधिसूचनांप्रमाणे विविध विभागांकडून त्यांच्या अधिनस्त असलेले अधिकारी / कर्मचारी यांच्या वेतननिश्चितीची पडताळणी केली जाते.
वेतननिश्चिती प्रकरणांची पडताळणी करतांना काही प्रमाणात त्रुटी / उणीवा/ अपूर्णता आढळून आल्यास पथकांकडून प्रकरणे आक्षेपीत केली जातात. सदरचे आक्षेपांची पुर्तता करण्यासाठी संबंधित कार्यालयांकडून बराच कालावधी लागत असतो. परिणामी अशी प्रकरणे पडताळणीपासून दीर्घकाळ प्रलंबित राहतात.
सेवापुस्तकांना वेतन पडताळणी पथकाकडून लागणाऱ्या आक्षेपांची संख्या कमी व्हावी यासाठी मार्गदर्शक म्हणून “वेतन पडताळणी मार्गदर्शिका” ही पुस्तिका प्रसिध्द करण्यात आलेली आहे,