प्रभाकर कोळसे: वर्धा
राज्यात कोरोना संसर्गाचे पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली.राज्य मंडळाच्या दहावी परीक्षेचा निकाल १५जुलै दरम्यान अपेक्षित आहे.तदनंतर दोन आठवड्यात जुलै अखेर किंवा आगस्टच्या पहिल्या आठवड्यात अकरावीचे प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे.अकरावी प्रवेश प्रक्रिया राबविताना सामायिक प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना सामायिक प्रवेश परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार सर्व कनिष्ठ महाविद्यालयात प्राधान्य देण्यात येईल.सामायीक प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेशानंतर कनिष्ठ महाविद्यालयात रिक्त राहिलेल्या उर्वरित जागा ज्या विद्यार्थ्यांनी सामायिक प्रवेश परीक्षा दिलेली नाही अशा विद्यार्थ्यांसाठी खुल्या असतील.त्यांना १० वी मुल्यमापन पद्धतीनुसार मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येईल.
शासन निर्णय- 👇