शशिकांत इंगळे,अकोला
वार्ताहर: नॅशनल पेन्शन स्कीम मध्ये पैसे गुंतवणूक करण्यासाठी खातेधारकांना एक दिलासादायक बातमी आहे. या योजनेमध्ये ५ लाख रुपये पर्यंत गुंतवणूक असलेल्या ग्राहकांना पूर्ण गुंतवणूक रक्कम काढण्याची परवानगी देण्यात आली आहे. गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार सेवानिवृत्त झाल्यानंतर किंवा ६० वर्षाचे झाल्यानंतर पेन्शन खात्यातून पूर्ण पैसे काढता येतील असा निर्णय आहेपेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ॲथॉरिटी यांनी घेतला आहे.
नव्या नियमानुसार रुपये ५ लाख किंवा त्यापेक्षा कमी कॉर्पस फंड जमा असलेल्या ग्राहकांना पूर्ण पैसे काढण्याची मुभा मिळाली आहे. तसेच विमा कंपन्यांकडून कोणतीही योजना घेणे बंधनकारक नाही. या योजनेत सहभागी होण्यासाठी वयोमर्यादा ६५ वर्षे आहे. तसेच योजनेतून बाहेर पडण्याची वयोमर्यादा ७० वर्षे निश्चित करण्यात आलेली आहे. यापूर्वीच्या नियमानुसार पूर्ण पैसे काढण्यासाठी जास्तीत जास्त २ लाख रुपये होती. त्यापेक्षा अधिक रक्कम असल्यास ६० टक्के रक्कम काढता येत होती.