शिक्षकांचे कामांचे मूल्यमापन होणार का? शिक्षक प्रशिक्षण प्रणालीच्या निविदामुळे गोंधळ.

235

शशिकांत इंगळे,अकोला

शिक्षकांच्या कामांचे मूल्यमापन विद्यार्थ्यांच्या परीक्षेतील गुणवत्तेनुसार करण्याच्या हालचाली शिक्षण विभागाकडून सुरू आहे. त्यासाठी शिक्षकांचे शिक्षक प्रशिक्षण प्रणाली तयार करण्यासाठी विभागाकडून निविदा मागविण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्वत्र गोंधळ निर्माण झाला आहे. शिक्षकांचे मूल्यमापन विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होणार का? याबाबत सध्या संभ्रम शिक्षकांमध्ये निर्माण झालेला दिसतो आहे. कोरोनामुळे शाळा वर्षभरापासून बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत वारंवार सर्वत्र गोंधळ निर्माण झालेला आहे. त्यात आता नव्याने शिक्षकांच्या मूल्यमापनाचा ही प्रश्न समोर आलेला आहे. विद्यार्थ्याच्या चाचणी परीक्षा किंवा परीक्षा यातील कामगिरीनुसार शिक्षकांचे मूल्यमापन याबाबत शिक्षण विभागाकडून हालचाली सुरू आहेत. शिक्षकांचे मूल्यमापन बाबत विभागाने शिक्षण-प्रशिक्षण प्रणालीचे ₹ ३० कोटीची निविदा काढल्याने शिक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झालेला आहे.

▪️शिक्षकांच्या मनात निर्माण झालेले प्रश्न:-
व्हाट्सअप टेलिग्राम अशा सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पसरत आहेत. विद्यार्थ्यांच्या परीक्षेतील कामगिरीनुसार शिक्षकांचे मूल्यमापन कसे होणार? याबाबतचे अनेक प्रश्न शिक्षक बंधूमधून उपस्थित झाले आहेत.

शिक्षकांच्या प्रशिक्षण आणि मुल्यांकनासाठी स्वतंत्र प्रणाली तयार करण्याचे नियोजन शिक्षण विभागाने केले आहे. त्यासाठी निविदा सुद्धा मागितले आहेत. ‘ विद्यार्थी शिक्षक शाळा यांची माहिती संकलन करण्यासाठी सरल प्रणाली माहितीशी ही नवी प्रणाली जोडण्यात येईल. यामध्येच संपूर्ण नोंदी ठेवण्यात येतील. सोबतच विद्यार्थी संख्या विद्यार्थ्यांचे गुण इत्यादी. त्यानुसार त्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांचे मूल्यमापन होणार आहे. त्या त्यादृष्टीने विद्यार्थ्यांचे परीक्षा घेण्याची यंत्रणा सुद्धा प्रणालीत निविदेत स्पष्ट सांगण्यात आले आहे. परंतु शिक्षण विभागाच्या विविध संघटनांकडून नाराजीचा सूर दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here