यंदा अशी असणार ११वी ची प्रवेश प्रक्रिया

618

प्रभाकर कोळसे,हिंगणघाट:-

काय आहे प्रवेशासाठी कार्यपद्धती-

मा. मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षामध्ये इ. १० वीच्या परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना सरसकट इ. ११ वी मध्ये प्रवेश देण्यात यावा. सन २०२१-२२ या वर्षासाठी इ. ११ वी प्रवेशासाठी खालीलप्रमाणे कार्यपध्दती ठरविण्यात येत आहे:

सामाईक प्रवेश परीक्षा

१. इ. ११ वी प्रवेशासाठी संपूर्ण राज्यामध्ये एक सामाईक प्रवेश परीक्षा (CET) घेण्यात येईल.

२. सदर सामाईक प्रवेश परीक्षा राज्य मंडळाच्या इ. १० वीच्या अभ्यासक्रमावर आधारीत असेल.

३. सदर सामाईक प्रवेश परीक्षेसाठी प्रश्न पत्रिकेचे स्वरुप हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाचे(Multiple Choice Objective Type Questions) असेल. सदर परीक्षा O.M.R. आधारीत असेल.

४. सदर सामाईक प्रवेश परीक्षा १०० गुणांची राहील व परीक्षेचा कालावधी दोन तासांचा असेल.

५. इ. ११ वी प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा ही विद्यार्थ्यांसाठी पूर्णत: ऐच्छिक असेल.

इ. ११ वीची प्रवेश प्रक्रीया राबविताना सामाईक प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना सामाईक प्रवेश परीक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्राधान्य देण्यात येईल. म्हणजेच इ. ११ वीच्या प्रवेश प्रक्रीयेच्या पहिल्या टप्यामध्ये सामाईक प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्राधान्याने प्रवेश देण्यात येईल. सामाईक प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशानंतर, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये रिक्त राहीलेल्या उर्वरित जागा ज्या विद्यार्थ्यांनी सामाईक प्रवेश परीक्षा दिलेली नाही अशा विद्यार्थ्यांसाठी खुल्या असतील व त्या जागांवर सामाईक प्रवेश परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता१० वीच्या मुल्यमापन पध्दतीनुसार मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येतील.

सन २०२१-२२ च्या इयत्ता ११ वी प्रवेशासंदर्भात घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षेबाबत. (CET)
शासन निर्णय-२४ जून २०२१ डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक सविस्तर माहितीसाठी खालील शासन निर्णयाचे अवलोकन करावे:-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here