Udise Plus 2020/21 ची माहिती आपण सर्व शाळांनी भरलेली असेलच. यातीलच 43 क्रमांकावर असलेला सर्टिफाय (Cerify) नावाचा टॅब आता ऍक्टिव्ह झाला आहे. आपण भरलेली आपल्या शाळेची माहिती सर्टिफाय कशी करावी हे आपण जाणून घेणार आहोत. ही माहिती सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांना अतिशय उपयुक्त आहे.
आपली Udise plus ची माहिती सर्टिफाय करण्यासाठी खालील स्टेप्स follow करा.
★ सर्वप्रथम Chrome ब्राऊजर ओपन करा.
★ सर्च बार वर Udise Plus असे टाईप करा. खाली Udise + या नावाची वेबसाईट दिसेल त्यावर क्लिक करा.
★ आपण मोबाईल वरून लॉग इन करत असाल तर, आपली स्क्रिन लॅपटॉप किंवा डेस्कटॉप सारखी दिसावी यासाठी सर्च बारच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या तीन डॉट्स वर क्लिक करा व Desktop site या पर्यायासमोरील चौकटीत टिक करा.
★ साईट ओपन झाली की Login असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
★ आता User name या रकाण्यात आपल्या शाळेचा Udise नंबर टाईप करा.
★ त्यानंतर Password च्या रकाण्यात आपला पासवर्ड नमूद करा.
★ आता दिलेला कॅप्चा Captcha कोड जसाच्या तसा टाईप करा, आणि लॉगिन (Login) वर क्लिक करा.
★ लॉग इन झाल्यावर आपल्या शाळेची Udise माहिती दिसेल. खाली (click here to open DCF to fill the data.) असा टॅब दिसेल त्यावर क्लिक करा.
★ आता पुन्हा एक टॅब येईल त्याला Ok करा.
★ आता आपल्याला स्क्रिनवर आपण आतापर्यंत Udise च्या संबंधित जेवढी माहिती भरलेली असेल ती दिसेल.
★ वरच्या बाजूला आपले स्टेटस Not Certified असे दिसेल. त्याच्याच बाजूला आपले फॉर्म कम्प्लिट आहेत की नाही ते पण दिसेल.
★ पहिल्या टॅबवर School Profile हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करून आपल्या शाळेच्या माहितीत काही बदल करू शकतो, माहिती अपडेट केल्यावर शेवटी Save या पर्यायावर क्लिक करा.
★ आता सर्वात खाली Validation हा टॅब दिसेल त्यावर क्लिक करून आपली माहिती valid आहे की नाही ते तपासून घ्या व शेवटी Validate हा पर्याय निवडा. आता सर्व फॉर्म्स चे स्टेटस आपल्याला Successful असे दिसेल.
★ आता सर्वात खाली Comparison and Certify Data हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
★ त्यानंतर खालच्या डाव्या बाजूला Cerification Module नावाचा टॅब ओपन होईल त्यात खलील उजव्या बाजूला असलेल्या रकाण्यात टिक करा.
★ सर्टिफिकेशन मोड्युल मध्ये, Declaration by मध्ये मुख्याध्यापकांचे नाव, पद व मोबाईल क्रमांक दिलेल्या रकाण्यात टाईप करा.
★ आता खाली Certify Data हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
★ आता आपल्याला School Data has been certify successfully असा मेसेज दिसेल.
★ सुरुवातीला आपले स्टेटस जे आपल्याला Not Certified दिसत होते ते आता Certified असे दिसेल.
अशाप्रकारे आपल्या शाळेची Udise ची माहिती आपण सर्टिफाय करून घेऊ शकतो.
—- सतीश लाडस्कर,भंडारा