आपले व्हाट्सऍप स्टेटस काही व्यक्तींनी बघू नये असं आपल्याला वाटतंय का? अशी सेटिंग केल्यास आपल्याला हव्या त्याच व्यक्ती आपले व्हाट्सऍप स्टेटस बघू शकतील.

348

आपल्यापैकी बहुतेक लोक दररोज आपले व्हाट्सऍप स्टेटस अपडेट करत असतात. त्यामध्ये, वाढदिवसाच्या शुभेच्छा, काही सुविचार, बातम्या, मनोरंजक तसेच प्रेरणादायी व्हिडिओ, ताज्या घडामोडी अशा बऱ्याच बाबींचा समावेश असतो. काही लोकांचे स्टेटस हे वैयक्तिक स्वरूपाचेही असतात.
Whatsapp स्टेटस च्या डिफॉल्ट सेटिंग मध्ये, आपण ठेवलेले स्टेटस आपल्या कॉन्टॅक्ट मधील सर्वांनाच दिसावेत अशी सेटिंग केलेली असते. पण आपल्याला जर वाटत असेल, की आपले स्टेटस हे आपल्या संपर्कातील / कॉन्टॅक्ट मधील काही व्यक्तींना दिसू नयेत, किंवा काही विशिष्ट व्यक्तींनाच ते दिसावेत, तर व्हाट्सऍप स्टेटस मध्ये अशा काही सेटिंग्ज दिलेल्या आहेत, की ज्यामुळे आपण आपल्या स्टेटस वर कंट्रोल ठेऊ शकतो. चला तर, जाणून घेऊया ही ट्रिक!

Whatsapp स्टेटस सेटिंग करण्यासाठी खालील स्टेप्स follow करा.

● सर्वप्रथम आपले व्हाट्सऍप सुरू करा.

● आता वर असलेल्या STATUS (स्टेटस) वर क्लिक करा.

● त्यांनतर वरच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या तीन डॉट्स वर क्लिक करा.

● आता स्टेटस प्रायवसी (Status Privacy) हा पर्याय निवडा.

● आपल्याला तीन पर्याय दिसतील.
My contacts
My contacts except…..
Only share with

● आता आपले स्टेटस संपर्कातील सर्वांनाच दिसावे असे वाटत असल्यास My contacts हा पर्याय निवडून Done वर क्लिक करा.

● आपले स्टेटस कॉन्टॅक्ट मधील काही लोकांना दिसू नये असे वाटत असल्यास, My contacts except… हा पर्याय निवडा.

● आता कॉन्टॅक्ट लिस्ट ओपन होईल, ज्यांनी स्टेटस बघू नये असं वाटतं ते कॉन्टॅक्ट निवडा व शेवटी Done वर क्लिक करा.(सिलेक्ट केलेले लोक आता तुमचे स्टेटस बघू शकणार नाहीत.)

● आपले स्टेटस संपर्कातील काही विशिष्ट व्यक्तींनाच दिसावे असे वाटत असल्यास, Only share with हा पर्याय निवडा.

● आता कॉन्टॅक्ट लिस्ट ओपन होईल, ज्यांनी स्टेटस बघावे असे वाटते ते कॉन्टॅक्ट निवडा व शेवटी Done वर क्लिक करा.

● आता तुम्ही निवडलेले लोकच तुमचे स्टेटस बघू शकतील.

अशाप्रकारे आपल्या स्टेटस च्या privacy वर आपण कन्ट्रोल ठेऊ शकतो.

—– सतीश लाडस्कर, भंडारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here