व्हाट्सऍप द्वारे करता येईल ऑनलाईन ट्रांझेक्शन;काय आहे प्रोसेस…!

249

आता ऑनलाईन पेमेंट मेथड्स (Online Payment Methods) मध्ये ‘Whatsapp’ ची भर.

हल्लीच्या तंत्रयुगात बहुतेक बाबींचे डिजिटलायजेशन झालेले आहे. तसेच पूर्वीच्या तुलनेत ऑनलाईन व्यवहार बरेच वाढले आहेत. ऑनलाईन आर्थिक व्यवहारासाठी सध्या बरीच साधने उपलब्ध आहेत. त्यामध्ये पेटीएम (Pay-tm), फोन-पे (Phone-pay), गूगल पे (google pay) अशी अनेक UPI माध्यमे हल्ली जलदगतीने वाढत आहेत. त्यात आणखी एक भर पडली ती म्हणजे Whatsapp ची.

हो आता या इतर साधनांप्रमाणेच आपल्याला Whatsapp द्वारे पण पैसे ट्रान्स्फर (Money Transfer) करता येणं शक्य झालं आहे. काही दिवसांपूर्वीच Whatsapp ने Payment नावाचं एक नवीन फिचर वापरकर्त्यांसाठी उपलब्ध करून दिलं आहे.

चला तर मग, Whatsapp चं हे नवीन फिचर कसं वापरायचं ते आपण जाणून घेऊया.

खालील स्टेप्स follow करा

1) सर्वप्रथम आपले Whatsapp ओपन करा.

2) आता वरच्या उजव्या कोपऱ्यात जे तीन डॉट्स आहेत त्यावर क्लिक करा.

3) त्यानंतर असलेल्या पर्यायांपैकी Payments हा पर्याय निवडा. ( payments हा पर्याय दिसत नसल्यास आपले Whatsapp अपडेट करून घ्या.)

4) आता Add payment method या पर्यायावर क्लिक करा.

5) आपल्या समोर, आता अटी व शर्ती मान्यतेसाठी प्रस्ताव असेल तो Accept and continue करा.

6) अटी व शर्ती मान्य केल्यावर सर्व बँकांच्या नावांची यादी समोर येईल, त्यापैकी आपली बँक निवडा.

7) बँक खाते निवडताना त्या बँक खात्याला लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकाचे सिम आपले Whatsapp असलेल्या मोबाईल मध्ये असणे आवश्यक आहे.

8) बँक निवडल्या नंतर आपला मोबाईल क्रमांक Verify केला जाईल.

9) नंबर व्हेरिफाय झाला की लगेच आपले Whatsapp, UPI ऑनलाईन ट्रांझेक्शन साठी तयार असेल.

आपण कोणत्याही UPI वर किंवा कोणताही QR कोड स्कॅन करून आता पैसे ट्रान्सफर करू शकता.

— सतीश लाडस्कर,भंडारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here