आदिवासी विकास विभागातील इयत्ता १ ली ते १० वीच्या विद्यार्थ्यांनी स्वाध्याय योजना (student whatsApp based Digital home Assessment Yojna) लाभ घेणेबाबत….

300

भारत देशात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्यातील सर्व महानगरपालिका, सर्व नगरपालीका व सर्व नगरपंचायत आणि ग्रामिण क्षेत्रातील सर्व सरकारी व खाजगी शाळा बंद करण्यात आलेल्या होत्या, सदरच्या लॉकडाऊन कालावधीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शिक्षण विभागाने इयत्ता १ ली ते इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यासाठी स्वाध्याय योजना (student: whatsApp based Digital home Assessment Yojna ) दिनांक ०३ नोव्हेंबर, २०२० पासून सुरु केलेली आहे.

सदर योजनेअंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ मध्ये विद्यार्थ्याचे अध्ययन किती प्रमाणात झाले आहे, या अनुषंगाने पुढील चार आठवडयामध्ये (दिनांक १५ मे ते ५ जून २०२१) या कालावधीत पायाभूत क्षमता व त्या त्या इयत्तेचे महत्वाचे शिक्षण परिणाम (Learning Outcomes) यावर आधारित प्रश्न असणार आहेत.

तसेच शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ या वर्षात विद्यार्थी ज्या इयत्तेमध्ये शिक्षण घेत होते त्याच इयत्तेचे स्वाध्याय त्यांनी सोडवायचे आहेत, म्हणजेच ज्यांनी स्वाध्याय उपक्रमात यापूर्वी रजिस्ट्रेशन केले / स्वाध्याय उपक्रमात सहभागी आहेत त्या विद्यार्थ्यांनी पुन्हा नव्याने रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यक्ता नाही. ज्यांनी यापुर्वी रजिस्ट्रेशन केले नाही त्यांना रजिस्ट्रेशन करुन https://wa.me/918595524519?text=Namaskar

या लिंकचा वापर करावा. तसेच सदर उपक्रमासाठी शाळेचा युडायस क्रमांक अनिवार्य झाला असल्याने शाळेतील शिक्षकांनी शाळेचा युडायस क्रमांक विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन द्यावा.

उपरोक्त प्रमाणे प्रकल्प अधिकारी यांनी आपल्या अधिनस्त असलेल्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षकांना त्यांचे स्तरावरुन कळविण्यात यावे व शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील इयत्ता १ ली ते इयत्ता १० वीचे जास्तीत जास्त विद्यार्थी सदर योजनेचा लाभ घेतील याबाबत प्रयत्न करावे व केलेल्या कार्यवाहीबाबत आयुक्तालयास अवगत करावे.असे मा. उपआयुक्त(शिक्षण)
अदिवासी विकास आयुक्तालय महाराष्ट्र राज्य,नाशिक यांनी पत्राद्वारे कळविले आहे.

सबंधित पत्र:-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here