विद्यार्थ्यांना कोरोना लस देणे बाबत शिक्षण समितीच्या बैठकीत चर्चा; BMC करणार विद्यार्थ्यांच्या लसीकरणाचे नियोजन

342

शशिकांत इंगळे,

वार्ताहार:-१८ वर्षाखालील विद्यार्थ्यांचे लसीकरण झाल्यास येत्या शैक्षणिक वर्षात सरकारच्या परवानगीने शाळा सुरू करून शिक्षण देता येईल. मुलांच्या लसीकरणाची परवानगी मिळाल्यानंतर तातडीने महानगर पालिकेने लसीकरण करण्यासाठी सज्ज राहणे आवश्यक आहे. याकरिता नियोजन करण्याबाबतची मागणी मुंबई महानगर पालिकेकडून शिक्षण समितीच्या बैठकीत करण्यात आली आहे.

केंद्र व राज्य स्तरावरून लसीकरणाबाबत योग्य परवानगी मिळाल्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिकत असलेले २ लाख ९८ हजार २१५ विद्यार्थ्यांसाठी कोविड-१९ लसीकरणाची पूर्वतयारी तसेच नियोजन आवश्यक आहे.
गेल्या सत्रात ऑनलाइन पद्धतीने शिक्षण दिले गेले परंतु साधनांची उपलब्धता नसल्याने तेवढ्या प्रमाणात ऑनलाइन शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकले नाही. जर महानगरपालिका प्रशासनाने लसीकरणाची पूर्वतयारी तसेच नियोजन केल्यास येत्या शैक्षणिक सत्रात विद्यार्थ्यांच्या आरोग्य सुरक्षित ठेवून राज्य सरकारच्या परवानगीने ऑफलाइन पद्धतीने शिक्षण देणे शक्य होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here