‘Global Teacher Prize’ जागतिक शिक्षक पुरस्कार आणि नव्याने या वर्षी सुरू करण्यात आलेल्या ‘Global Student Prize’ जागतिक विद्यार्थी पुरस्कार या पुरस्कारांसाठी अर्ज करण्याची व नामांकनाची प्रक्रिया लांबविण्यात आली असून त्याची अंतिम मुदत आता 16 मे 2021 आहे.
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील एका छोट्या जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक मा. श्री. रणजीतसिंह डिसले यांच्या शिक्षण क्षेत्रातील अतुलनीय कार्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील जागतिक शिक्षक पुरस्कार Global Teacher Prize देणाऱ्या वार्की फाउंडेशन या संस्थेने यावर्षी $50000 US डॉलर एवढ्या रकमेचा ग्लोबल टीचर पुरस्काराचाच भगिनी पुरस्कार म्हणता येईल असा Global Student Prize जागतिक विद्यार्थी पुरस्कार सुरू केला आहे. या पुरस्कारा द्वारे जगभरातील विलक्षण, असामान्य विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर वास्तव परिणाम व प्रभाव टाकण्याच्या, समवयस्क सहाध्यायी यांच्या जीवनावर व त्याही पलीकडे एकूण समाजावरच प्रभाव टाकून सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या प्रयत्नांना प्रकाश झोतात आणण्यासाठी एक नवे व्यासपीठ तयार करण्यात आले आहे. 16 वर्षे वयाखालील, कोणत्याही शैक्षणिक संस्थेत अथवा प्रशिक्षण व कौशल्य विकास प्रोग्राम मध्ये प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा पुरस्कार खुला आहे. अर्धवेळ विद्यार्थी तसेच ऑनलाइन अभ्यासक्रमात प्रवेशित विद्यार्थी देखील या पुरस्कारासाठी पात्र आहेत.
जागतिक शिक्षक पुरस्कार व जागतिक विद्यार्थी पुरस्कार एकत्रितपणे शिक्षण प्रक्रियेच्या दोन्ही बाजूंच्या प्रेरणादायक कथा सांगतील. तरुणांना त्यांच्या व जगाच्या उज्वल भविष्यासाठी तयार करण्यासाठी शिक्षक करीत असलेल्या उत्कृष्ट कार्यावर आणि विद्यार्थी करीत असलेल्या अध्ययनातून व त्याही पलीकडे त्यांच्या प्रयत्नांतून जगासाठी अतिशय विश्वासात्मक आशादायी चित्र निर्माण करणाऱ्या सर्वात हुशार चुणुककदार विद्यार्थ्यांच्या कामगिरीवर हे पुरस्कार प्रकाशझोत टाकतील.
जागतिक शिक्षक पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या शिक्षकांचे मूल्यमापन करताना यांच्या अध्यापन पद्धती व तंत्रे, स्थानिक आव्हानांना सोडवण्यासाठी त्यांनी शोधलेली नाविन्यता, स्पष्ट दिसतील व दाखवता येतील अशा अध्ययन निष्पत्ती विद्यार्थ्यांमध्ये कशा घडवून आणतात, आपल्या नाविन्यपूर्ण उपक्रमातून वर्गा पलीकडे समाजावर कसा प्रभाव पाडतात, आपल्या विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे नागरिक बनवण्यासाठी कसे प्रयत्न करतात, आपला शिक्षकी पेशा सुधारत त्याला कशी बाह्य संस्थांकडून मान्यता व प्रशस्ती मिळवतात या सर्व गोष्टी तपासल्या जातील.
जागतिक विद्यार्थी पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कामगिरी, त्यांचा त्यांच्या समवयस्क सहाध्यायावरील प्रभाव, ते त्यांच्या समाजात व त्याहीपलीकडे एकंदर जागतिक समाजावर कसा प्रभाव पाडतात, प्रतिकूलतेवर विजय मिळवून ते कसे यश संपादन करतात, ते त्यांच्यातील सृजनशीलता, सर्जनशीलता व नाविन्य कसे प्रदर्शित करतात व ते जागतिक नागरिक म्हणून कसे कार्य करतात या सर्व गोष्टींचे मूल्यमापन केले जाईल.
मागील वर्षी भारतातील महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परिते वाडी जिल्हा सोलापूर या शाळेतील मुलींच्या आयुष्यात अमुलाग्र बदल घडवून आणणाऱ्या श्री. रणजीत सिंह डिसले या एका ग्रामीण भारतीय शिक्षकाला युनेस्कोच्या भागीदारीत जागतिक शिक्षक पुरस्कार 2020 विजेता म्हणून निवडले गेले होते.
सदर ‘जागतिक शिक्षक पुरस्कार’ व ‘जागतिक विद्यार्थी पुरस्कार’ साठी अर्ज करण्याची अंतिम मुदत दिनांक 16 मे 2021 आहे. या तारखेनंतर आलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
पुरस्कारासाठी Online अर्ज करण्यासाठी:- https://www.globalteacherprize.org/
- —-राकेशकुमार सुभाष नांद्रे – माध्यमिक शिक्षक शासकीय माध्यमिक , आश्रम शाळा बुबळी ता. सुरगाणा, जि. नाशिक