शैक्षणिक शुल्कासाठी विदयार्थ्यांचे शैक्षणिक वर्षातील वार्षिक निकाल पत्रक/ गुण पत्रक/ शाळा सोडल्याचा दाखला इत्यादी अडवू नये.

429

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करीता शाळा प्रशासनाने करावयाच्या कार्यवाहीबाबत ..

सदया कोविड १९ या विषाणूचा प्रादुर्भाव वेगाने होत असून, कोरोनाची दुसरी लाट भारतभर सुरु झालेली आहे म्हणून महाराष्ट्र शासनाने त्यासंदर्भातील निर्बंध/नियमावलीचे पालन करणे सक्तीचे केलेली आहे.शाळा प्रशासनाने कोरोना कालावधी असल्याने खालीलप्रमाणे कार्यवाही करावी.

१. शैक्षणिक वर्षे २०२१-२२ या करीता महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क नियंत्रण विनियमन अधिनियम, २०११ मध्ये नमुद केल्याप्रमाणे शैक्षणिक शुल्क पालक-शिक्षक संघामार्फत व पालकांना विश्वासात घेवून शुल्क निश्चित करावे. त्याचप्रमाणे शिक्षण शुल्का व्यतिरिक्त इतर शुल्क आकारणी जसे की क्रिडांगण फी, स्नेह संमेलन फी, वाचनालय फी, प्रयोगशाळा फी, अल्पोहार फी, बस फी इत्यादी सारखे जे उपक्रम सुविधा सदयस्थितीत राबविले पुरविले जात नाहीत अशा अतिरिक्त शुल्काची आकारणी करु नये.

२. विदयार्थ्यांच्या प्रवेशासंदर्भात पालक किंवा विदयार्थी यांची लेखी अथवा तोंडी परीक्षा घेऊ नये.

३. विदयार्थ्यांना प्रवेश देतांना शाळांनी कोणत्याही प्रकारची देणगी फी घेऊ नये.

४. पुर्नप्रवेश फी घेऊ नये.

५. शैक्षणिक शुल्क आकारणेबाबत सवलत किंवा मुदत वाढ देण्यात यावी.

६. शाळांनी वहया, पुस्तके, सॉक्स-शुज, दप्तरे इत्यादी शैक्षणिक साहित्याची/गणवेशाची विक्री करु नये किंवा विशिष्ट दुकानातूनच खरेदी करण्याची सक्ती करु नये. चालू वर्षी गणवेश बदलू नये.

७. शैक्षणिक शुल्क भरले नाही या कारणाने कोणत्याही विदयार्थ्याचे ऑनलाईन शिक्षण बंद करु नये.


८. विदयार्थ्यांचे शैक्षणिक वर्षातील वार्षिक निकाल पत्रक/ गुण पत्रक/ शाळा सोडल्याचा दाखला इत्यादी अडवू नये.


९. शैक्षणिक शुल्क आकारणी, शैक्षणिक साहित्य, गणवेश खरेदी इत्यादी कारणास्तव पालकांवर व विदयार्थ्यांवर मानसिक दबाव आणू नये.

संदर्भित पत्र:-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here