आदिनाथ सुतार,राजूर(अह. नगर):-
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या तर्फे अवांतर वाचनासाठी ऑनलाईन पुस्तकांचा खजिना बालगोपाळ व वाचनाची आवड असणारे पुस्तक प्रेमींसाठी परिषदेने उपलब्ध करून दिली आहे. ही पुस्तके राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या संकेेेतस्थळावर:–
पुस्तके वाचण्यासाठी येथे क्लिक करा click here
या पुस्तकाव्दारे बालगोपाळांचे भावविश्व संमृध्द करण्याचा प्रयत्न केला आहे.या ऑनलाईन पुस्तकांच्या नगरीत लहानगे बदकाचे पिलू,चंदुची वाट,श्रावणातील जत्रा, चला सक॔स पाहू या,भारी कोण, सव॔श्रेष्ट कोण, मिठाई, झोका, भूमातेचे पुत्र,बबलीचं डोलकं सप्तरंगी चेंडू इत्यादींसह विविध विषयांवरील एकसष्ट पुस्तके ऑनलाईन अवांतर वाचनासाठी उपलब्ध झाली आहेत. या दृष्टिकोनातून अवांतर वाचनाची पुस्तके मुलांसाठी उपलब्ध केल्याचे परिषदेने जाहिर केले असून सदर संकेतस्थळावरील उपलब्ध पुस्तकांचा मुलांनी लाभ घ्यावा असे आवाहन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या तर्फे करण्यात आले आहे.