शैक्षणिक वर्ष संपल्याची घोषणा करावी- शिक्षक आमदार कपिल पाटील यांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

308

कृष्णा कालकुंद्रीकर,सिधुदुर्ग:-

शैक्षणिक वर्ष संपलेलं आहे.परंतु याची कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.त्यामुळे राज्यातील शिक्षण क्षेत्रामध्ये संभ्रमावस्था आहे.ऑनलाईन शिक्षणाला विद्यार्थी, शिक्षक व पालक तिघेही कंटाळलेले आहेत.प्रत्येक वर्षी मार्चमध्येच शिक्षण विभाग पुढच्या वर्षाच्या कामकाजाच्या नियोजनाचे परिपत्रक काढत असते.त्यानुसार राज्यभरात वर्षभराचे शैक्षणिक उपक्रम, परीक्षा व सुट्टया यांचे नियोजन केले जाते. गेल्या वर्षीपासून ही पद्धत बंद केली की काय?असा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर्षीही राज्याच्या शिक्षण संचालकांनी नियोजनाचे परिपत्रक अद्याप काढलेले नाही. याबाबत तातडीने कार्यवाही होणे गरजेचे आहे. कृपया आपण पुढील मुद्दयांबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश द्यावेत, ही विनंती.

१) शैक्षणिक वर्ष समाप्तीची घोषणा करण्याबाबतचे परिपत्रक काढावे.

२) पुढील शैक्षणिक वर्षाच्या नियोजनाचे परिपत्रक काढावे. जेणेकरून विद्यार्थ्यांना पुढील वर्षाची शाळा सुरु होण्याची तारीख कळविता येईल.

३) शाळासिद्धी व युडायसची माहिती भरण्याची मुदत २६ एप्रिल दिलेली आहे. राज्यात लॉकडाऊन असल्यामुळे लॉकडाऊन नंतरची तारीख देण्यासंदर्भात परिपत्रक निघणे गरजेचे आहे.

४) कोविड काळात बजावलेले कर्तव्य आणि शैक्षणिक कार्य करताना राज्यातील ज्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोविड झाला आहे अशा सर्वांचा रजा कालावधी कर्तव्य कालावधी समजण्यात यावा, असे परिपत्रक तात्काळ काढण्यात यावे. कारण वर्ष समाप्तीमुळे शिक्षक-शिक्षकेतरांच्या सेवापुस्तकात रजांची नोंद करण्यात येते.

अशी विनंती शिक्षक भारतीचे संस्थापक, शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांच्याकडे केली आहे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here