टेक्नो टिप्स:- मोबाईल हरवला तरी संपर्क क्रमांक नाही हरवणार

191

    मित्रांनो मोबाईल च्या वापरामुळे आपली पारंपरिक डायरीवर मित्रांची, नातेवाईकांची फोन नंबर लिहून ठेवण्याची सवय आता हळू हळू कमी होत चालली आहे. बरेच वैज्ञानिक असे सुद्धा सांगतात की तंत्रज्ञानाच्या कृत्रिम बुद्धिमतेमुळे मानवी बुद्धी चे संकलन कार्य कमी झाले आहे .यामुळे पूर्वी जसे जवळच्या मित्र, नातेवाईक यांचे नंबर लक्षात राहत होते ते प्रमाण आता फक्त घरातील फोन नंबर लक्षात राहतात.
आज आपण बघणार आहोत आपल्या मोबाईल मध्ये सेव्ह केलेले संपर्क क्रमांक जर तो मोबाईल हरवला अथवा खराब झाला तरी कसे सुरक्षित राहणार ?
त्यासाठी संपर्क क्रमांक मोबाईल किंवा सिम मध्ये सेव्ह न करता ते आपल्या गुगल अकाउंट वर सेव्ह करावे लागतील म्हणजे दुसऱ्या मोबाईल मध्ये ईमेल लॉगिन होऊन सर्व क्रमांक परत मिळवता येतील.
ही सेटिंग करण्यासाठी आपल्या मोबाईल वर ज्यांचा क्रमांक सेव्ह करायचा तो डायल करा आता क्रमांक सेव्ह ( create contact) तिथे बघा कुठे सेव्ह करावे (store the contact to) हा पर्याय दिसते त्या पुढे सिम कार्ड/डिव्हाईस अस असेल तर त्यावर क्लिक करा. तिथे तुमचं गुगल अकाउंट दिसेल त्यावर क्लिक करा, झाला तुमचा संपर्क क्रमांक गुगल वर सेव्ह.आता या नंतर जेव्हढे काही क्रमांक तुम्ही सेव्ह करत जाल ते सर्व गुगल अकाउंट वर सेव्ह होतील म्हणजे हा मोबाईल हरवला तरी दुसऱ्या मोबाईल वरून परत मिळवता येतील.
धन्यवाद..!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here