एप्रिल-मे २०२१ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्रांबाबत (Hall Ticket)…

417

 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांचेशी संलग्न असलेल्या सर्व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक/प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी व पालक आदींना सूचित करण्यात येते की, उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा एप्रिल-मे२०२१ साठी सर्व विभागीय मंडळातील सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशपत्र (Hall Ticket) उपलब्ध करून देण्यात येत आहेत. सर्व उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना एप्रिल-मे२०२१ च्या उच्च माध्यमिक

प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेची प्रवेशपत्रे (Hall Ticket) ऑनलाईन (Online) पध्दतीने मंडळाच्या www.mahahsscboard.in  या संकेतस्थळावर शनिवार, दिनांक ०३/०४/२०२१ पासून college login मध्ये download करण्याकरिता उपलब्ध होतील. या संदर्भात काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.

ऑनलाईन प्रवेशपत्रे (Hall Ticket) उपलब्ध करून घेण्याच्या अनुषंगाने सूचित करण्यात येते की,

१. एप्रिल-मे२०२१ साठी सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ
महाविद्यालयांनी इ.१२ वी परीक्षेची ऑनलाईन प्रवेशपत्रे प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यावयाची आहेत.

२. प्रवेशपत्र (Hall Ticket) ऑनलाईन (Online) पध्दतीने प्रिटींग करताना विद्यार्थ्यांकडून त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये. सदर प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकांचा/प्राचार्यांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी.

३. प्रवेशपत्रामध्ये (Hall Ticket) विषय व माध्यम बदल असतील तर त्यांच्या दुरुस्त्या उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळात जाऊन करुन घ्यावयाच्या आहेत.

४. प्रवेशपत्रावरील (Hall Ticket) फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्याचे नाव या संदर्भातील दुरुस्त्या उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर करुन त्यांची एक प्रत विभागीय मंडळाकडे त्वरीत पाठवावयाची आहे.

५. प्रवेशपत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास संबंधित उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी पुनःश्च प्रिंट काढून त्यावर लाल शाईने व्दितीय प्रत (Duplicate) असा शेरा देऊन विद्यार्थ्यांस प्रवेशपत्र द्यावयाचे आहे.

६. फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्याचा फोटो चिकटवून त्यावर संबंधित मुख्याध्यापक/प्राचार्य यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करावयाची आहे. तरी एप्रिल-मे २०२१ मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी ) परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेले सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक /प्राचार्य, सर्व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालये यांनी उपरोक्त बाबींची नोंद घेऊन त्याप्रमाणे उचित कार्यवाही करावी.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here